सोमय्यांचा गौप्यस्फोट; 'पोलीस आयुक्त संजय पांडे करणार शिवसेनेत प्रवेश'

Sanjay Pandey| Kirit Somaiya| Shivsena| यापुर्वी आयुक्त संजय पांडे यांनी आपल्या विरोधात बोगस एफआयआर दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
Sanjay Pandey Latest marathi News| Kirit Somaiya Latest News| Kirit Somaiya on Sanjay Pandey
Sanjay Pandey Latest marathi News| Kirit Somaiya Latest News| Kirit Somaiya on Sanjay PandeySarkarnama

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दररोज महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) काहीना काही आरोप करत असतात. अशातच आज त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांवर मोठा आरोप केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) हे महाविकास आघाडीच्या आदेशानुसार काम करत असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Kirit Somaiya on Sanjay Pandey)

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. खासदार नवनीत राणा यांनी तुरुंगात पोलिसांनी आपल्याला वाईट वागणूक दिल्याचा आरोप केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेत, महाविकास आघाडी आणि पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यावर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस स्टेशनमधील राणा दाम्पत्याचा कॉफी पितानाचा एक व्हिडीओ टाकला.

Sanjay Pandey Latest marathi News| Kirit Somaiya Latest News| Kirit Somaiya on Sanjay Pandey
'राणा दांपत्यांनी सरकारी चहाशी तरी इमान राखायचे!'

आयुक्त संजय पांडे यांनी आपल्या विरोधात बोगस एफआयआर दाखल केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावरूनच आता भाजप नेते आक्रमक झाले असून आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहे. त्यापुर्वीच किरीट सोमय्यांनी केलेल्या संजय पांडे यांच्याबाबत दावा केला आहे. येत्या दीड महिन्यात संजय पांडे यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे, असे सांगत, किरीट सोमय्या म्हणाले, संजय पांडे यांनीपोलीस अधिकाऱ्यांना माझा एफआयआर नोंदवून न घेण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दीड महिन्यात त्यांना शिवसेनेत प्रवेश करायचा आहे. आम्ही लवकरच राज्यपालांची भेट घेत असून गरज पडल्यास आम्ही उच्च न्यायालयातही जाऊ." असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या दाव्यावर विचारले असता खासदार संजय राऊत यांनी पलटवार केलाा आहे. या आधीच्या पोलीस आयुक्तांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदार झाले. ते तुम्हाला चालतं का? ते त्यांच्या पालख्या उचलत आहेत. कायदेशीर कारवाई केली तर त्यांच्यावर शिक्का मारता? असा प्रतिप्रश्न त्यांनी भाजपला केला आहे. तसेच, ईडीचा जॉइंट डायरेक्टर राजेश्वरसिंग भाजपात सामिल झाला. आमदारकीची निवडणूक जिंकली. त्यांच्यासह अनेकांची व्हिजिलन्स चौकशी सुरु आहे. इतर अनेक राज्यातील पोलीस आयुक्त, आयएएस अधिकारी भाजपात गेले. त्यासंदर्भात भाजप काय उत्तर बोलणार, हे आधी त्यांनी स्पष्ट करावं, असे खुले आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com