Sanjay Raut Bail News : तर... संजय राऊतांचा जामीन रद्द होणार?

एक महिन्यापुर्वी शिवेसना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama

Sanjay Raut Bail: एक महिन्यापुर्वी शिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. राऊत या प्रकरणात जवळपास शंभरहून अधिक दिवस तुरुंगात होते. आता पुन्हा एकदा ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज (६ जानेवारी) या याचिकेवर सुनावणी होणार असल्याने आता राऊत यांचा जामीन कायम राहणार की रद्द होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

ईडीने संजय राऊत यांच्या जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. ईडीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून युक्तिवाद करण्यात आला आहे. आता या याचिकेवर पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे.

Sanjay Raut Latest News
Parbhani : एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादीतील ३० नगरसेवक शिंदे गटात

दरम्यान, गेल्या महिन्यात शिवसेना (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांना 100 दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आला. राऊतांना जामीन मंजूर होताच 'आता मी पुन्हा लढेन, अशा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला होता. 'आता मी पुन्हा लढेन, न्यायालयाचे आभार, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता, अशी मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मात्र, ती अत्यंत बोलकी होती. राऊतांच्या जामीनावरील सुनावणी वेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. न्यायालयाचा कुटुंबीयही भावूक झाले होते. न्यायालयात सुनावणी वेळी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, मुलगी आणि त्यांचे भाऊ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com