..तर बॅगा भरायच्या आणि देश सोडून निघून जायचं; मनसेच्या मुस्लिमांना थेट इशारा

Hindu muslim Politics | काही मुस्लीम लोकांनी रात्रीच्या वेळी फटाक्यांचा आवाजाने त्रास होत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांनी केली होती.
Hindu muslim Politics | Amey Khopkar
Hindu muslim Politics | Amey Khopkar

Hindu muslim Politics मुंबई : देशभरात दोन वर्षांच्या कालावधीनंतर दिवाळी साजरी केली जात आहे. तर दूसरीकडे काही मुस्लीम लोकांनी रात्रीच्या वेळी फटाक्यांचा आवाजाने त्रास होत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांनी केली होती. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Hindu muslim Politics | Amey Khopkar
गुजरात निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; तिकीट वाटपात शहांची मोठी घोषणा

मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत ज्यांना फटक्यांचा त्रास होत असेल त्यांनी देश सोडून जा अशा शब्दांत सुनावले आहे. ''ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा,'' असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

तर मनोज चव्हाण यांनीही, या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. “विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे,” असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे साडेचार वाजता त्यांच्या परिसरात फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. तर दूसऱ्या एका ट्विटमध्ये सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्री दोन वाजता कांदिवली गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचे ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी ट्वीटला उत्तर देत संबंधितांना कळवल्याचे उत्तर दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com