Rupali Patil Criticized Nitesh Rane:
Rupali Patil Criticized Nitesh Rane: Sarkarnama

Rupali Patil Criticized Nitesh Rane: ...तर टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे...; राणेंच्या टीकेला रुपाली ठोंबरेंचं सणसणीत उत्तर..

Maharashtra Politics : महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत आहे.” अशी जहरी टीका आज (२७ मे) भाजप नेते नितेश राणे यांनी केली.

Rupali Thombre Criticized Nitesh Rane : “ सरड्यालाही लाज वाटेल एवढ्यावेळा खासदार संजय राऊत रंग बदलतात. महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राजाराम राऊत आहे.” अशी जहरी टीका आज (२७ मे) भाजप नेते नितेश राणे यांनी केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

Rupali Patil Criticized Nitesh Rane:
New Parliament : संसद भवन उद्धघाटनापूर्वीच केजरीवाल, खर्गे अडचणीत ; राष्ट्रपतींबाबत वादग्रस्त विधान करणं भोवलं..

भाजपने राजकारणाचा स्तर पूर्णपणे खाली नेला आहे. संजय राऊत यांची सकाळी प्रेस कान्फरन्स झाली की त्यांच्या नंतर भाजप नेते नितेश राणे त्याला उत्तर द्यायला किंवा मनोरंजन करायला येत आहेत. पण गौतमी पाटीलची (Gautami Patil) तुलना का करायची. गौतमी तिच्या पोटापाण्यासाठी जो व्यवसाय करते. पण महिलेला हिनवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा सवाल रुपाली पाटील यांनी नितेश राणेंना विचारला आहे.

जर संजय राऊत गौतमी पाटील असतील तर टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का, जे तमाशा सुरु असताना मध्ये मध्ये येऊन मनोरंजन करतात. मग टिल्लू भाऊ नक्कीच नाच्या आहेत. त्यांनी भाषा जपून वापरावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) थोडी जरी सभ्यता राहिली असेल तर , अशा वाचाळविरांना त्यांनी आवर घालावा. केंद्रात आणि राज्यात त्यांचचं सरकार आहे. पण कामाचा एकही विषय नाही. पण विरोधकांनी काही बोललं की त्यावर असं काहीतरी बरगळत राहायचं.... दिवसभर ती चर्चेत राहिल असं काहीतरी बोलायचं, असं जर असेल तर, नितेश राणे आमचे टिल्लू भाऊ भाजपचे नाच्या आहेत.... अशी जहरी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com