शिवसेना अशीच वागणार असेल तर राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागेल

राष्ट्रवादीला विश्वासात न घेता विकासकामांचे श्रेय शिवसेना घेत आहे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड
shivsena-Jitendra Awhad
shivsena-Jitendra AwhadSarkarnama

वाशी : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आहे. मात्र, नवी मुंबईत राष्ट्रवादीला विश्वासात न घेता विकासकामांचे श्रेय शिवसेना घेत असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना असेच वागणार असेल तर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही आव्हाडांनी दिला आहे. (... so NCP will have to think differently in the elections : Jitendra Awhad)

ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्‌घाटन सोहळ्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रित न केले नव्हते. त्या बाबत शिवसेनेचे नेते आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना जाब विचारणार असल्याचेही गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी स्पष्ट केले.

shivsena-Jitendra Awhad
महाराष्ट्र सदनातील भुजबळांच्या खोलीचे लाॅक उघडेना...

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन वाशी येथील लक्ष्मीनारायण सभागृह, ऐरोलीत करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

shivsena-Jitendra Awhad
ठाकरे सरकारचा ओबीसी आरक्षणासंदर्भातील कट सुप्रीम कोर्टामुळे उघड

शिवसेना एकाच पद्धतीने काम करत असेल तर एक प्रकारे भाजपला सत्तेची दार स्वत: खुले करून देत असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. महाविकास आघाडीसाठी आपण प्रयत्न केले; परंतु सध्या शिवसेनेतील नेते राष्ट्रवादीला विचारात घेत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्‍यामुळे आगामी निवडणुकीत ठाणे जिल्हा पुन्हा एकदा भाजपला काबीज करणे सोपे होईल. शिवसेनेने वेळीच आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करीत आव्हाड यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे.

शिवसेना नेत्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे

शिवसेनेत आलेले नवीन गवते यांच्याकडून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष किशोर ऊर्फ अन्नू आंग्रे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव रचला जात असल्याचे आव्हाड म्हणाले. जर गुन्हे दाखल करायचे होते, तर गंभीर गुन्हे दाखल करायचे होते, असे सांगत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आंग्रे यांना खुद्द मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पाठीशी घातले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com