Sanjay Raut On CM Shinde: ''...म्हणून एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार!''; ठाकरे गटाच्या संजय राऊतांचा नवा बॉम्ब

Political News : पाकिस्तानशिवाय मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात...
Sanjay Raut , Eknath Shinde
Sanjay Raut , Eknath ShindeSarkarnama

Mumbai News: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकार येत्या 15 ते 20 दिवसांत कोसळणार असल्याचा दावा केला होता. तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील सरकारला धोका नाही. पण मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत असं सूचक वक्तव्य केलं होतं. मात्र, आता खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत, असा दावाच केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी सोमवारी(दि.२४) सकाळी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. राऊत म्हणाले, छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे. त्यांच्या मताशी सहमत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. पडद्यामागे खूप काही सुरू आहेत. त्याची कारणं काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर त्यांनी सांगावं. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut , Eknath Shinde
Opposition Meet : मोदींच्या विरोधात एकजूट ; देशातील तीन बड्या नेत्यांमध्ये खलबते..

भाजपला ताकद देण्यात मुख्यमंत्री अपयशी...

राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपला जे हवं ते साध्य करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांना राज्यातील महाविकास आघाडीचं आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर केला. ते काम पूर्ण झालं आहे.

...त्यामुळेच मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली

पण महाराष्ट्रात जे राजकीय साध्य करायचं होतं ते भाजपला करता आलं नाही. भाजपला ताकद देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. हे भाजपच्या लक्षात आलं आहे. मिंधे आल्यापासून भाजपही रसातळाला जात आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री (Chief Minister) बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut , Eknath Shinde
Manchar Bazar Samiti Election: दिलीप वळसे पाटलांना धक्का; उमेदवारी नाकारलेल्या देवदत्त निकमांनी ठोकले शड्डू

पाकिस्तानशिवाय मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात...

शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना ठाकऱ्यांची आहे. हे उद्धव ठाकरे म्हणाले. ते बरोबर आहे. पण निवडणूक आयोगाला कळत नाही. त्यात चुकीचं काय? असा सवालच राऊत यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी ठाकरेंवर बोलणारे निवडणुका जिंकण्यासाठी वारंवार पाकिस्तानचाच जप करतात. पाकिस्तानशिवाय मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात असं आव्हानच राऊत यांनी यावेळी दिलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com