Ajit Pawar News : ...म्हणून जयंत पाटलांना फोन केला नाही; अजित पवारांनी सांगितलं कारण !

Ajit Pawar on Jayant Patil : सगळ्यांचा फोन आला मात्र अजितदादांचा फोन नाही...
Ajit Pawar on Jayant Patil :
Ajit Pawar on Jayant Patil :Sarkarnama

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची ईडीने (ED News) केलेल्या नऊ तासांच्या चौकशी नंतर आज सकाळी पाटील हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेण्यासाठी पोहचले होते.

दरम्यान, या भेटीआधी प्रसारमाध्यमांशी जयंत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी पाटील यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP News) नेते अजित पवारांचा फोन आला का? यावर पाटील यांनी नकार दर्शवत, "नाही त्यांचा फोन आला नाही," असे पाटील यांनी सांगितले.

Ajit Pawar on Jayant Patil :
Akluj Bazar Samiti : अकलूजमध्ये पुन्हा मोहिते पाटील : मदनसिंहांकडे सलग चौथ्यांदा बाजार समितीची धुरा; पांढरेंना एकनिष्ठेचे फळ

जयंत पाटील यांच्या या उत्तरामुळे एकच चर्चा सुरू झाली. अजित पवारांचा फोन आला नाही, यामुळे माध्यमात बातम्या झळकत होत्या, परंतु आता स्वत: अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांचीही ईडी चौकशी झाली. आमचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांची ईडी चौकशी झाली, तेव्हाही मी फोन केला नाही. मला वाटतं की, फोन करण्यापेक्षा प्रत्यक्ष भेट घेऊन या गोष्टींची चर्चा केली पाहिजे, असे अजित पवार (Ajit pawar News) म्हणाले.

Ajit Pawar on Jayant Patil :
Rahul Gandhi Truck Travel : 'भारत जोडो' नंतर राहुल गांधींची 'ट्रक यात्रा'; चक्कं दोन राज्यांचा प्रवास ट्रकमधून..

दरम्यान, गेल्या आठवड्यात ईडी'ने जयंत पाटलांना (Jayant Patil) नोटीस पाठवली होती. या नोटीशीनुसार सोमवारी जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजरही झाले. ईडी च्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडेनऊ तास त्यांची चौकशी केली. चौकशीनंतर रात्री साडे नऊच्या दरम्यान जयंत पाटील बाहेर आले आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com