तर... सर्व संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करेन; ईडीच्या कारवाईवर राऊतांचे खुले आव्हान

ED Action on Sanjay raut| ED| एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
sanjay raut
sanjay raut

मुंबई : अंमलबजावणी संचलनालयाने (ED) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. यात दादरमधील फ्लॅट आणि अलिबागमधील ८ भुखंड जप्त करण्यात आले आहे. एक हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईवर संजय राऊत यांनी असत्यमेव जयते, गांधीजी आज परत मरण पावले, असे म्हणत प्रतिक्रीया दिली आहे. ईडीने जप्त केलेली संपत्ती ही कष्टाने कमावलेली संपत्ती आहे. त्यातील एक रुपयाची संपत्ती अवैध मार्गाने, चूकीच्या मार्गाने कमावलेली सापडली तर ती सर्व संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. जर आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेल, पण सुडाच्या कारवायांना घाबरणार नाही, असेही त्यांनी यावेळी नमुद केलं.

sanjay raut
ईडीकडून संजय राऊतांची मालमत्ता जप्त

याशिवयाय गेल्या वेळी जे ५५ लाखांचे कर्ज जमा केले त्या कर्जाची माहिती शपथपत्रात नमुद केली आहे. पण त्यांनी माझ्यावर आणि राज्यातील इतर मंत्र्यांवर कारवाई करुन त्यांनी स्वत:ची कबर खोदायला सुरुवात केली असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीसरकार पडावे, यासाठी ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला ईडीच्या या कारवाईची पुर्वकल्पना होती. माझ्यावर राज्यातील सरकार पाडण्यासाठी दबाव टाकला गेला. डोक्याला बंदूक लावली तरी तरी ईडीच्या कारवायांना घाबरणार नाही, सुडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आली आहे. पण अशा कारवायांमुळे संजय राऊत तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

दरम्यान,एक हजार ३४ लाखांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राईत यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जमिनी खरेदीचे व्यवहार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटणकर यांची पत्नी स्वप्ना पाटणकर यांच्या नावाने खरेदी करण्यात आले होते. भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असून स्थानिकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्याचेही आरोप करण्यात आले आहेत .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com