
Pankaja Munde Share her Memories : '' यशश्रीचा जन्म झाला तेव्हा मी ११ वर्षांची होते. तिच्या बर्थडेचा केक आणला तेव्हा केकवर तिच्या नावाचं इंग्रजीत स्पेलिंग लिहायचं होतं. पण मी मराठी माध्यमात शिकत असल्याने तिच्या नावाचं स्पेलिंग चुकलं. त्यानंतर आई-बाबांशी भांडून मी यशश्रीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अॅडमिशन घ्यायला लावलं, यशू इंग्रजी माध्यमात शिकणारी आमच्या घरातील पहिली मुलगी होती. '' अशी आठवण भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde Latest news) यांनी सांगितली. एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या दोघी बहिणी खासदार प्रितम मुंडे आणि अॅड. यशश्री मुंडेही यावेळी उपस्थित होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी बाबांशी भांडून- भांडून तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला लावलं. मला माहिती नाही मी असं का केलं पण तेव्हा आमच्या घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा पगडा होता. त्यामुळे आम्ही सर्व भावंडं मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो. मी प्रितम आणि यशश्री दोघीनांही शिकवायचे. या दोघीही माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहेत. मी यांच्यापेक्षा कमी शिकले.मला डॉक्टर व्हायचं होतं, पण एमबीए केलं, प्रितमला वकील व्हायचं होत ती डॉक्टर झाली, यशश्रीला मात्र हवं ते होता आलं. बाबांना मात्र तिने इंजिनिअरिंगला जावं असं वाटत होतं. असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. (Pankaja munde news)
मी या दोघीनांही म्हणत असते, की तु राजकारण सोडून तुझा दवाखाना सुरु कर, यशश्रीला म्हणत असते की, तु तुझी प्रॅक्टिस सुरु कर.माझ्याकडे डिग्री पुर्ण नाही झाली. माझं लास्ट सेमिस्टर पुर्णनाही झालं. त्याची मला खूप खंत आहे. पण मी या दोघीनांही काय म्हणत असते की तुम्ही कधीही तुमच्या पायावर उभ्या राहू शकता.
माझ्या घरचे मला अमेरिकेला पाठवायला तयार झाले. तिथे जाऊन त्यांनी मला मास्टर्स करण्याची परवानगी दिली. लग्नानंतर मी अमेरिकेला गेले.तिथे अॅडमिशनही घेतलं पण मी प्रेग्नेंट झालं. त्यामुळे मला थांबावं लागलं. माझ्या डिग्रीमध्ये थोडा कुंडलीचा प्रॉब्लेम आहे, अशी मिश्लिक टिप्पण्णीही त्यांनी यावेळी केली. (Maharashtra Politics)
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.