Smriti Irani : 'भारत जोडो' यात्रेचं नवीन नामकरण ? ; स्मृती इराणींनी उडवली कॉंग्रेसची खिल्ली

Smriti Irani on Bharat Jodo Yatra : ही यात्रा हे कॉंग्रेसचे ढोंग आहे, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.
Smriti Irani, Rahul Gandhi
Smriti Irani, Rahul GandhiSarkarnama

Smriti Irani on Bharat Jodo Yatra: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्याची रणधुमाळी सध्या सुरु आहे. भाजपच्या नेत्या, केंद्रीय मंत्री स्म़ृती इराणी या गुजरातमध्ये प्रचार करीत आहेत. त्यांनी काल (शनिवारी) राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेवर निशाणा साधला आहे.

स्मृती इराणी यांनी 'भारत जोडो'यात्रेचं नवीन नामकरण करुन काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. इराणी या एका सभेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मुळात भारत तुटलेला नाही, तर जोडण्याचा संबधच येत नाही, त्यामुळे कॉंग्रेसने 'भारत जोडो' असे म्हणणे चुकीचे आहे. 'भारत जोडो' यात्रा ही खऱ्या अर्थानं 'कॉँग्रेस शोधा यात्रा'आहे.

'गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीनंतर ही'कांग्रेस ढूंढो यात्रा' ही ८ डिसेंबरनंतर सुरु करायला पाहिजे होती.निवडणूक प्रचारात गांधी परिवार गायब आहे,' असे स्मृती इराणी म्हणाल्या. ही यात्रा हे कॉंग्रेसचे ढोंग आहे, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.

Smriti Irani, Rahul Gandhi
Girish Bapat : खासदार गिरीश बापटांच्या मनात नेमकं चाललयं तरी काय ?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा (Bharat Jodo Yatra) सध्या मध्यप्रदेशात आहे. 7 सप्टेंबरला तामिळनाडूतील कन्याकुमारीमधून (Kanyakumari) ही यात्रा सुरु झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष वेगळ्या रणनीतीवर काम करत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहा ऑक्टोबरला कर्नाटकमध्ये भारत जोडो यात्रेत हजेरी लावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com