राणा दांपत्याच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या सहा शिवसैनिकांना अटक

आमदार रवी राणा यांनी न्यायालयाच्या पायरीवरून ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.
राणा दांपत्याच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या सहा शिवसैनिकांना अटक
Shiv SainiksSarkarnama

मुंबई : खार येथील खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ, घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली सहा शिवसैनिकांना खार पोलिसांनी रविवारी (ता. २४ एप्रिल) अटक केली. तसेच, गोंधळ घालणाऱ्या इतर शिवसैनिकांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. (Six Shiv Sainiks arrested for rioting outside Rana couple's house in mumbai)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा राणा दाम्पत्यांनी दिला होता. त्यामुळे शनिवारी सकाळपासून राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, शिवसैनिकांनी बॅरिकेड्‌सवर चढून राणा यांच्या घरापुढे जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर आज सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. गोंधळ घालणाऱ्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

 Shiv Sainiks
खासदाराच्या निकटवर्तीयाच्या आमदारकीच्या स्वप्नाने शिवसेनेत ठिणगी; २५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

दरम्यान, शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये रंगलेल्या वादानंतर शनिवारी (ता. २३ एप्रिल) नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज (ता. २४ एप्रिल) वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी आमदार रवी राणा यांनी न्यायालयाच्या पायरीवरून ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या.

 Shiv Sainiks
दोन लाखांपेक्षा जादा कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारांचे मोठे वक्तव्य

खार पोलिसांनी शनिवारी राणा दाम्पत्याला अटक केली, तेव्हा राणा दाम्पत्य प्रचंड आक्रमक झाले होते. खार पोलिसांनी दोघांनाही अटक करून सांताक्रूझ पोलिस ठाण्यात आणले होते. शनिवारची रात्र पोलिस ठाण्यातच काढल्यानंतर आज त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाच्या परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 Shiv Sainiks
जयंतरावांनी पवारांसमोर सुनील शेळकेंचे कौतुक केले; पण आमदारांनी श्रेय दिले कार्यकर्त्यांना!

राणा पती-पत्नीस न्यायालयात आणण्यात आले, तेव्हा दोघेही आक्रमक झाल्याचे चित्र होते. न्यायालयाच्या पायऱ्यांवरच त्यांनी ‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना थेट न्‍यायालयात नेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.