Uddhav Thackeray : घरात बसून टोमणं मारणं म्हणजे हिंदुत्व नव्हे; उद्धव ठाकरेंवर तुषार भोसलेंचा निशाणा

Tushar Bhosale : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या मजारीवर कारवाई
Uddhav Thackeray, Tushar Bhosale
Uddhav Thackeray, Tushar BhosaleSarkarnam

Maharashtra Politics : गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवतिर्थ मैदानावर सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरले नाहीतर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला.

यासह माहीम येथील समुद्र किनाऱ्यावर नव्याने तयार झालेल्या मजारीकडेही त्यांनी लक्ष वेधले. असे अतिक्रमण केवळ सरकार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाने वाढत असल्याची टीकाही ठाकरेंनी केली. या अतिक्रमणावर महिन्याभरात कारवाई झाली नाही तर तेथे गणपती मंदीर उभारू, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करीत तेथील मजार हटविली आहे.

Uddhav Thackeray, Tushar Bhosale
Vidhan Parisad News : गुलाबराव अडीच तास सभागृहात, पण खडसे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचेच उत्तर हवे..

राज ठाकरे यांनी माहीम येथील समुद्राकिनाऱ्यावर झालेल्या मजारीचा व्हिडिओच भरसभेत दाखविला. मजारीचे अतिक्रमण म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार, अधिकारी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणार असेल तर नागरिकांनीच सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. भरसभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहीमच्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधल्याने शासनाने त्यांची तात्काल दखल घेतली. त्यानंतर कायदेशीर कारवाई करीत तेथील मजार हटविण्यात आली. या कारवाईनंतर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी भोसले यांनी हिंदुत्व म्हणजे काय असते, हे सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. भोसले म्हणाले, "राज ठाकरे यांनी लक्षात आणून दिल्यानंतर रातोरात चक्रे फिरली आणि हिंदुत्ववादी शिंदे-फडणवीस सरकारने (State Government) सूर्य उगवताच त्या मजारीवर बुलडोझर चालविला आणि हिरवा झेंडा खाली घेतला. उद्धव ठाकरे बघताय ना हिंदुत्व कशाला म्हणतात. तुमच्यासारखे घरात बसून टोमणे मारणे आणि अधर्म होत असताना मूग गिळून गप्प बसणे याला नाही."

Uddhav Thackeray, Tushar Bhosale
Khadse-Mitkari News : ‘ते’ पाकिस्तानातून आलेले असले तरी हिंदू आहेत, त्यांच्या जमिनी वर्ग एक मध्ये टाका !

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतरच काल रात्री मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महानगरपालिका प्रशासन (BMC) अॅक्शन मोडवर आले. या मजारीच्या परिसरात रात्रीपासूनच पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. त्यानंतर आज सकाळी महानगरपालिकेचे पथक सर्व यंत्रणेसह तेथे पोहोचले. पथकाने माहीमच्या समुद्रातील मजार परिसरातील चौथरा आणि इतर अनधिकृत बांधकाम पाडले. त्यानंतर तेथील राडारोडा हटविण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in