ईडीची नोटीस आली अन् मुख्य सचिव कुंटे म्हणाले...

अनिल देशमुख प्रकरण व पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणाच्या चौकशीही कुंटे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
ईडीची नोटीस आली अन् मुख्य सचिव कुंटे म्हणाले...
Sitaram Kunte Sarkarnama

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणासह पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीवर उत्तर देताना कुंटे यांनी गुरूवारी (ता. 25) चौकशीला उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस कुंटे सेवानिवृत्त होत आहेत. आधीच त्यांना 25 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. पण कुंटे ईडीच्या कार्यालयात जाणार नाही. गुरूवारी मंत्रिमंडळाच्या बैठका असल्याचे कारण त्यांनी दिले आहे, असं वृत्त एएनआयने दिले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरण आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या चौकशी प्रकरणात कुंटे यांची चौकशी केली जाणार असल्याचे वृत्त आहे. कुंटे हे महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला.

Sitaram Kunte
बोलावू तेव्हा हजर व्हा! 'एनआयए' न्यायालयाची भाजप खासदाराला तंबी

परमबीरसिंग यांनी देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपानंतर गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण बाहेर आहे. शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा धक्कादायक अहवाल दिला होता. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आणि त्यांच्या पोस्टींगसाठी मध्यस्थांमार्फत लाचेचा मुद्दा समोर आला. त्यामुळे राज्यभर वादळ उठलं.

ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्या दोन खासगी सचिवांनाही अटक केली आहे. सीबीआयकडूनही खंडणी प्रकरणाचा तपास केला जात आहे. फोन टॅपिंग प्रकरणात कुंटे यांनी राज्य सरकारला अहवालही सादर केला आहे. यामध्ये त्यांनी शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार संबंधित काळात कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसल्याचे म्हटले आहे.

शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली त्यावेळी कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. त्यांनी परवानगी दिल्याचा दावा शुक्ला यांनी केला होता. पण परवानगी घेताना शुल्का त्यावेळी खोटं बोलल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची ईडीकडूनही चौकशी सुरू आहे. त्यामुळे ईडीने कुंटे यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in