गोंदियात महिलेवर अत्याचाराची परिसीमा : संतप्त प्रतिक्रियांनंतर तपासासाठी SIT ची स्थापना

Gondia Case : महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Gondia Case : मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस (Police) अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही. असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पिडीत महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहे.

Eknath Shinde Latest News
केंद्र सरकारने अजूनही शक्ती कायद्याला मंजुरी का दिली नाही? निलम गोऱ्हेंचा सवाल

दरम्यान, एकटीच माहेरी जाणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची घटना कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना आतापर्यंत अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. या अत्याचारामुळे पीडित महिलेला तीव्र जखमा आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता.

Eknath Shinde Latest News
‘एकनाथराव शिंदे, त्याचे उत्तर तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला दिले पाहिजे’

त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन या महिलेवर अत्याचार केला होता. त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. सध्या तिच्यावर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी घेतली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com