Budget Session : भाजप आमदाराकडून पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादी आक्रमक होताच व्यक्त केली दिलगीरी

Maharashtra Budget Session : विरोधकांचा सभागृहात गोंधळ
Sharad Pawar, Ajit Pawar, Budget Session
Sharad Pawar, Ajit Pawar, Budget SessionSarkarnama

Maharashtra Politics : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून सभागृहामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.

असे असतानाच आज भाजप आमदार राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ केला.

राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार हे चांगलेच आक्रमक झाले. तसेच राम सातपुते यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

Sharad Pawar, Ajit Pawar, Budget Session
Nagaland Assembly Result : नागालॅंड विधानसभेत ६० वर्षांनंतर पोचली महिला : NDPP च्या हेकानी जाखलू ठरल्या पहिल्या महिला आमदार

यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही याबाबत दिलगिरी व्यक्त केली. तसेच भाजपच्या आमदारांकडून पवार साहेबांबाबत असं एकेरी वक्तव्य आलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणाले.

Sharad Pawar, Ajit Pawar, Budget Session
Pune By Poll Election : चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाला बंडखोर उमेदवारामुळे 'कलाट'णी

यानंतर त्यांनी राम सातपुते यांना त्यांची भूमिका मांडण्याचे आवाहन आशिष शेलार यांनी केले. त्यानंतर सातपुते यांनी सभागृहात उभं राहून दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in