Sindhudurg : सिंधुदुर्गच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन....

बाळा गावडेंच्या Bala Gawade तडकाफडकी राजीनाम्यामुळे resignation जिल्ह्यातील काँग्रेस Congress पक्षात खळबळ उडाली होती.
Shindhudurg
Shindhudurg sarkarnama

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागल्याची टीका होऊ लागली होती. पण सिंदुधुर्गात मात्र, नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Shindhudurg
सिंधुदुर्ग जिल्हा बँक 'राणेमय' : बाळासाहेबांसह शरद पवार, सोनिया गांधींचे फोटो गायब

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला होता. बाळा गावडेंच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात खळबळ उडाली होती.

Shindhudurg
दीपक केसरकर म्हणाले, शिवसैनिकांना काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जायचे नाही

शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडी मतदार संघातून गावडे यांना मिळाली होती. काँग्रेसकडून त्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चाना उधाण होते. तसेच यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Shindhudurg
हिंगण्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत; खासदार तुमानेंच्या गळाला कोण लागणार ?

आज बाळा गावडेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, पर्यावरण विभाग प्रदेश सचिव सच्चीदानंद बुगडे, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, तसेच विभागीय सचिव संदीप कोठावळे, किरण गावडे, वैभव सुतार, अवी गावंड आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रसंगी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in