खोत-पडळकरांवर राष्ट्रवादीचा संशय; 'सदावर्तेंना मिळालेल्या पैशांतील काही वाटा मिळाला का?'

NCP | Gunratan Sadavrte | ST Strike | : सदावर्ते यांनी जवळपास ९० हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५५० घेतले असल्याचे पुढे आले आहे.
Sadabhau Khot,Gopichand Padalkar
Sadabhau Khot,Gopichand Padalkarsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थान हल्ला प्रकरणी (Silver Oak Attack) अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) सध्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ताब्यात आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. त्यांच्याविरोधात या आंदोलनाला चिथावणी दिल्याबाबत चौकशी सुरु आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबांमध्ये सदावर्ते यांनी जवळपास ९० हजार कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी ५५० घेतले असल्याचे पुढे आले असून हा आकडा कोट्यावधी रुपयांमध्ये असण्याची शक्यता आहे, याबाबतही पोलिस चौकशी करत आहेत.

याच तपासावरुन आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) व माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रकरणात पडळकर आणि खोत यांच्या चौकशीची मागणी केली आहे. एसटी कामगारांनी संप दरम्यान आझाद मैदानात ठिय्या दिला होता. यावेळी दोन आठवड्यांसाठी पडळकर व खोत हे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. या काळात त्यांनी महाविकास आघाडी सरकार व प्रमुख नेत्यांवर प्रचंड टीका केली.

Sadabhau Khot,Gopichand Padalkar
"तिचं वागणं मला काही कळत नाही" : पिडीतेच्या आरोपांवर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

कालांतरने चर्चेनंतर सरकारने कर्मचाऱ्यांच्या अंशतः मागण्या पूर्ण केल्या असल्याचे सांगत पडळकर आणि खोत यांनी या आंदोलनातून माघार घेतली. पण ज्याप्रमाणे पोलिस तपासात सदावर्ते यांनी पैसे घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदावर्तेंनी जमा केलेल्या पैशामध्ये या दोघांचाही काही वाटा आहे का? याचाही तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. तसेच 'गुणरत्न सदावर्ते यांनी रोखीत पैसे घेतले असतील तर रोख पैसे घेणे हा इन्कम टॅक्सच्या दृष्टीने गुन्हा असल्याचेही तपासे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com