अटकेतील कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट; जामिनासाठी पैसेही नाहीत

Silver Oak attack : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी एसटीचे 115 कर्मचारी न्यायालयीन कोठडीत आहेत
अटकेतील कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट; जामिनासाठी पैसेही नाहीत
Silver Oak attack update

मुंबई : सिल्व्हर ओक हल्ला (Silver Oak attack) प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले एसटीचे 115 कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अटकेत असलेले अनेक जण हे मुंबई बाहेरचे आहेत. या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असून त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत की हमीदारही नाहीत, अशी परिस्थिती असल्याचं त्यांच्या जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.

अटक केलेल्या आंदोलकांमध्ये 24 महिलांचाही समावेश आहे.सर्व आंदोलकांना जागेच्या उपलब्धतेनुसार आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात ठेवण्यात आले आहे. तसेच, सिल्व्हर ओकवरील हल्लाप्रकरणी न्यायालयाने मुंबई पोलिसांना येत्या 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत.

Silver Oak attack update
सदावर्तेंचा ताबा मिळविण्यासाठी रस्सीखेच; मुंबई, कोल्हापूर, अकोला पोलिसांमध्ये चढाओढ

या प्रकरणाचा तपास सुरू असून याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देऊ नये, अशी भूमिका घेत राज्य सरकारच्या वतीने जयश्री पाटील यांच्या याचिकेला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला होता. मात्र अद्यापही एफआयआरमध्ये जयश्री पाटलांच अद्याप नाव नोंदवण्यातआ लेलं नाही. तसेच एफआयआर क्रमांकांमध्ये काही तांत्रिक दोष असल्याच्या कारणाने न्यायलयाने त्यांना अंतरिम दिलासा मंजूर केला.

काय आहे प्रकरण?

उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नंतर ही मुदत आठवडाभराने वाढवण्यात आली. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते.

या आक्रमक कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी धाव घेत आंदोलन केले. शेकडोंच्या संख्येने हे आंदोलक पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले होते. कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक सुरु केली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.