सिल्वर ओक हल्ला प्रकरण : ११५ ST कर्मचाऱ्यांना आधी सरकारचा अन् आता न्यायालयाचा दणका

Silver oak | St Workers : कामावर परतण्याचा मार्ग बंद...
St workers Strike
St workers StrikeSarkarnama

मुंबई : उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानुसार एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी उद्याचा म्हणजे २२ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. त्यानुसार आता जवळपास ८० टक्के कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत. त्यामुळे बहुतांश गाड्या सुरु झाल्या असून सर्व आगार पूर्वपदावर येत आहेत. मात्र यामध्ये केवळ शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी केलेल्या हल्ल्यामध्ये गुन्हा दाखल होवून कोठडीत असलेल्या कोणालाही कामावर परतता येणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

या हल्ल्यानंतर काही दिवसांमध्येच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरातील आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले त्यांना सेवेत घेता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाकडे या कर्मचाऱ्यांचे डोळे लागले होते. पण न्यायालयानेही आज या कर्मचाऱ्यांच्या जामिन अर्जावर कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे या कामगारांची कामावर परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.

St workers Strike
ED ने ५८ दिवसांमध्येच चार्जशीट दाखल केल्याने मलिकांची जामिनाची शक्यता मावळली?

गुणरत्न सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार होती. पण आज वेळेअभावी ही सुनावणी होऊ शकली नाही. यावर आता शुक्रवारी सकाळी सुनावणी होणार आहे आणि उद्याच कामावर रूजू होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांसाठी २२ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे कामावर परतण्याचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com