'तो' व्हिडीओ व्हायरल करणे हे शिवसेनेतील काही मंडळींचे षडयंत्र : राहुल शेवाळेंचा आरोप

Eknath Shinde | Shivsena | Rahul Shewale : आमच्याच काही लोकांनी पाठबळ दिले
Rahul Shewale
Rahul ShewaleSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्याविरोधात एका कथित महिलेने फसवणुक आणि बलात्काराची तक्रार दिल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून या तरुणीसोबतचा एक व्हिडीओ देखील चांगलेच व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल करणे म्हणजे शिवसेनेतील काही मंडळींचे (Shivsena) षडयंत्र असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.

राहुल शेवाळे म्हणाले, मी गटनेते पदाची शपथ घेतली त्यावेळी संबंधित व्हिडिओ करून, पसरवून त्याची वाच्यता केली. हे षडयंत्र आहे आणि दुर्दैवाने त्याला आमच्याच काही लोकांनी पाठबळ दिले. शिवसेनेतील (Shivsena) काही मंडळी या व्हिडिओचा प्रसार करत आहेत. पण मुंबई पोलीस याची चौकशी करत आहेत तेच त्याला उत्तर देतील, असा खुलासाही शेवाळे यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका महिलेने खासदार राहुल शेवाळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत मुंबईच्या साकीनाका पोलिस स्थानकात तक्रारीत केली होती. खासदार शेवाळे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत, ही तक्रार संपूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले होते. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्पर तक्रार करण्यात आली आहे, असेही शेवाळे यांनी म्हटले होते.

त्यानंतर काही दिवसांपूर्वी राहुल शेवाळे यांनी आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात येत असल्याची तक्रार साकीनाका पोलिसांकडे दिली होती. शेवाळेंनी त्या महिलेच्या विरोधात खंडणी, फसवणूक, आणि बदनामी केल्याची तक्रार केली आहे. अंधेरी सत्र न्यायालयानेही साकीनाका पोलिसांना तक्रार घेण्याचा आदेश दिला होता.

'त्या' महिलेने आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी संपर्क साधला. तसेच काही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत शेवाळे यांनी त्यांच्या पत्नीशी घटस्फोट घेवून आपल्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणला. तिनं बदनामी करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरवात केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. शेवाळे यांच्याकडून संबंधित महिलेने आत्तापर्यंत ५६ लाख रुपये, आयफोनसह बारा भेटवस्तू घेतल्या आहेत. सोशल मीडियावर तिने शेवाळेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असल्याचे तक्रारीत नमूद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in