शिवसेनेनंतर फडणविसांचा राष्ट्रवादीला दणका; श्यामसुंदर शिंदे `सागर`किनारे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील सत्ता समिकरणे बदल्ली आहे
Shyamsunder Shinde
Shyamsunder Shindesarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्ता स्थापनेसाठी आता पावले वेगाने टाकण्यास सुरवात केली आहे. राज्यात 2019 पासून महाविकास आघाडीसोबत असलेले शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsunder Shinde) (कंधार) हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदे हे भाजपसोबत जाण्याची चिन्हे आहेत.

शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचे मत फुटल्याचा आरोप शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. परिणामी शिंदे हे नाराज होते. त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आत्ताचे चित्र पाहता ते भाजपसोबत जाणार असल्याचे दिसत आहे. भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे ते मेव्हणे आहेत. राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेले दुसरे आमदार संजय शिंदे हे आता काय करणार, याची उत्सुकता आहे. श्यामसुंदर शिंदे हे भाजपच्या गळाला लागल्याने इतर अपक्षांवरही त्याचा दबाव येऊ शकतो.

Shyamsunder Shinde
नारायण पाटलांच ठरलं : उद्धव ठाकरे नाही तर आता शिंदे हेच आपले नेते!

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन अपक्ष संयोगी आमदार होते. त्यामध्ये श्यामसुंद शिंदे, संजय शिंदे आणि देवेंद्र भुयार आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार हे आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत.

Shyamsunder Shinde
मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; औरंगाबाद, उस्मानाबादसाठी ऐतिहासिक दिवस

या बंडानंतर अनेक अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहटीला जाणे पसंत केले. त्याच बरोबर अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. अग्रवाल हे महाविकस आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या बरोबर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com