अमृता फडणवीसांच्या मदतीसाठी श्वेता महाले आल्या धावून

ठाकरे सरकार सिलेक्टिव्ह पद्धतीचं राजकारण करत असल्याचा आरोपही श्वेता महाले (Shweta Mahale) त्यांनी केला आहे.
Shweta Mahale
Shweta MahaleSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray)यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी जितेन गजारिया याला अटक करण्यात आली. मात्र या ट्विट प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्यात नवा वाद सुरु झाला आहे. या वादात आता भाजप नेत्या श्वेता महाले (Shweta Mahale) अमृता फडणवीसांच्या मदतीला धावल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे किंवा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल कुणी चुकीचे शब्द काढत असतील तर एक महिला म्हणून आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जाते, त्याची दखल घेतली जाते, त्याचप्रमाणे अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीप्पणी करणाऱ्या विद्या चव्हाण यांची दखल राज्य सरकारने दखल का घेतली नाही, असा सवाल श्वेता महाले यांनी केला आहे. तसेच, अमृता फडणवीसांवर आक्षेवार्ह टीप्पणी करणाऱ्याविरोधात कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाहत आहोत.

Shweta Mahale
'वहिनी नोटीस मिळाली का?' म्हणत विद्या चव्हाणांनी अमृता फडवीसांना पुन्हा डिवचलं

इतकेच नव्हे तर, ठाकरे सरकार सिलेक्टिव्ह पद्धतीचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख, माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत सरकारने काय भूमिका घेतली,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रकरण ?

भाजप आयटी सेलचा गजारिया याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. या मुद्द्यावरुन विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवत त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढले. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरे झाले. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाही, हेच मला भाजपला सांगावे वाटते, असे विधान विद्या चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

विद्याताई चव्हाणांनी केलेल्या डान्सिंग डॉलच्या उल्लेखामुळे अमृता फडणवीस मात्र कमालीच्या संतापल्या आहेत. अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांच्या घरातील गृहकलहाच्या मुद्द्यावरुन पटलवार केला. 'आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!' असा इशाराच फडणवीस यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in