संजय राऊतांना दिलासा नाहीच ; आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला

sanjay raut : संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने सोमवारी संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये ४ आँक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांच्या जेलमधील मुक्काम वाढला आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. (Sanjay Raut latest news)

संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. याच अंतर्गत ईडीने राऊतांवर मोठी कारवाई केली. संजय राऊतांनी प्रवीण राऊतांसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केले आहे, असा युक्तिवादही ‘ईडी’ने यापूर्वी केला होता.

Sanjay Raut
Sharad Pawar : कारण नसताना राऊतांना भाजपवाल्यांनी जेलमध्ये टाकलं..

राऊत यांच्याविरुद्ध प्रथम दोषारोपपत्र 1 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ‘ईडी’ आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे संजय राऊत यांच्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपचे नेतेमंडळी करत आहेत. यावर विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, "अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना जेलमध्ये टाकण्यात आले. भाजपवाल्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले आणि आता आम्हाला सांगयेत की, आम्ही वाऱ्यावर सोडले. भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहे,"

काय आहे प्रकरण ?

  • गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचे काम देण्यात आले होते. यावेळी प्रवीण राऊत यांनी या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

  • गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर भागातील या झोपडपट्टीचे काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला.

  • एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर आहे.

  • मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 12 वर्षांपूर्वी 50 लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com