'मातोश्री'वर जाणारा लोंढा रोखण्यासाठी श्रीकांत शिंदेही मैदानात उतरले!

श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली
Shrikant Shinde
Shrikant Shindesarkarnama

कल्याण : राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विराजमान झाल्याने कल्याण-डोंबिवलीमधील (Kalyan-Dombivali) शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच काही कार्यकर्त्यांनी 'मातोश्री' येथे भेटीगाठी सुरू केल्याने त्यांतील संभ्रम दूर करण्यासाठी स्वतः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) मैदानात उतरले आहेत. कल्याण पूर्वमधील शिवसेना मध्यवर्ती शाखेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत शिंदे यांनी संवाद साधला.

Shrikant Shinde
Video: नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे - देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सत्ता परिवर्तन घडवून आणत मुख्यमंत्री पदी झेप घेतली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीमधील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांना आम्ही कुणासोबत जायचे, असा प्रश्‍न पडला आहे. अनेकांनी मंगळवारी 'मातोश्री' गाठत उद्धव ठाकरे यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे सांगितले. याच पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी कल्याण पूर्वमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक रमेश जाधव, कैलाश शिंदे, महेश गायकवाड, नीलेश शिंदे, माधुरी काळे, विशाल पावशे, पप्पू पिंगळे, प्रशांत काळे, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.

Shrikant Shinde
आमच्या मतांवर निवडून आलात, त्याची तरी जाण ठेवा : गुलाबरावांनी राऊतांना सुनावले..

उल्हासनगर महापालिकेची स्थापना झाल्यापासून सत्तेच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या शहरातील साईपक्षाने आज खासदार शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. शिंदे कल्याण पूर्वेत आले असताना, साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांच्यासोबत माजी नगरसेवक बाबू मंगतानी, नवीन दुधानी, माजी नगरसेविका इंदिरा उदासी आदींनी त्यांची भेट घेऊन शिंदेंसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. शिंदे हे विकासकामात हेवेदावे, मतभेद करत नसून हा स्वभावच त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत राहणार, असे इदनानी यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण आशान उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com