
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर (Eknath Shinde Rebel) शिवसेनेला (Shiv Sena) लागलेली गळती कायम आहे. काँग्रेसमध्ली काही नेते, नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत.
मंगळवारी श्रीगोंदा नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाच्या सहा नगरसेवकांनी दिपाली सय्यद यांच्या उपस्थितीतीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिंदे गटात प्रवेश केला.
दिपाली सय्यद यांचा शिंदे गटात लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे. श्रीगोंदा नगरपालिकेसाठी त्यांनी पुढील नगराध्यक्ष करण्याच्या वाटचालीसाठी हा पहिला डाव खेळला होता. गेले दोन महिने वर्षा बंगला येथे पाठपुरावा करून दिपाली सय्यद यांनी काँग्रेसला श्रीगोंदा येथे झटका दिला आहे.
शिंदे गटाचे नेते, खासदार श्रीकांत शिंदे यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. काँग्रेसच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. दिपाली सय्यद यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाला आहे. दिपाली सय्यद याही लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
दिपाली सय्यद या शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा चार महिन्यापासून सुरु आहे. पण ऐनवेळी हा पक्षप्रवेश रद्द झाला. गेल्या काही दिवसांपासून भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांनी दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विरोध करत आधी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. त्यात प्रदेश महिला जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी, ठाण्यातील माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेबाबत नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिपाली सय्यद यांनी खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचसोबत मविआ सरकार काळात सय्यद यांनी भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांविरोधात खोटी तक्रार दिली होती. आमचा सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला विरोध नाही. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल तर त्यांनी भाजपा नेत्यांची माफी मागावी आणि महिला आघाडीच्या नेत्यांविरोधातील खोटी तक्रार मागे घ्यावी , असे भाजपने म्हणणं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.