श्रद्धा वालकर प्रकरण: महिला आयोगाची राष्ट्रीय महिला आयोगाला पत्राद्वारे मोठी मागणी

Shraddha Walker | 26 वर्षीय श्रद्धा वालकर ही मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती.
Shraddha Walker murder case
Shraddha Walker murder case

Shraddha Walker murder case मुंबई : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची दखल महाराष्ट्र महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने (State Commission for Women) राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहीले असून, हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालावे आणि संबंधित आरोपीला लवकरात लवकर फाशीची व्हावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

Shraddha Walker murder case
आदिवासी भागात रस्त्यांसाठी कार्यक्रम राबवणार!

''वसई,महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत झालेली निघृण हत्या आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटंबना हे सर्वच माणुसकीला काळीमा फासणारे आहे. मिसिंग तक्रारीनंतर याप्रकरणी मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलिसांनीतत्पर कारवाई केल्याने या ५ महिन्यापुर्वी झालेल्या गुन्ह्याचा छडा लागला. मात्र आता आव्हान आहे ते आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे आणि सशक्त दोषाआरोपपत्र लवकर दाखल करण्याचे.''

तसेच या नराधमाला ही लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणाचा तपास जलद होउन फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालावी यासाठी राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापुढे ही राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल. ' असे ट्विट करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे.

Shraddha Walker murder case
फडणवीसांनतर आता अमृता फडणवीसही म्हणतात, मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन...

काय आहे प्रकरण

श्रद्धा वालकर निर्घृण हत्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला अटक केली. आता पोलीस आफताब विरोधात दिल्ली पोलीस ठोस पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन दिवसांपासून मेहरौलीच्या जंगलात शोध घेत असलेल्या दिल्ली पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचे सुमारे 25 तुकडे सापडले आहेत. यातील 11 तुकडे मंगळवारी तर सोमवारीच 14 तुकडे सापडले.

दरम्यान, श्रद्धा हत्याकांडात केंद्रीय अन्वेषण विभागानेही हे प्रकरण हाती घेतले आहेत. सीबीआयच्या फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा केले असून ते पुरावे लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सीबीआयची ही मदत श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची पडताळणी करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण होती श्रद्धा वालकर?

26 वर्षीय श्रद्धा वालकर ही मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होती. तिथे तिची भेट आफताबशी झाली. दोघेही एकमेकांना आवडू लागले. सुरुवातीला या नात्याबद्दल श्रद्धाने घरच्यांना सांगितले नाही. पण, नंतर एक दिवस तिने सांगितले की ती आफताबसोबत लिव्ह-इनमध्ये राहत आहे. घरच्यांनी खूप समजावलं, पण श्रद्धा मान्य झाली नाही आणि काही वेळाने दोघेही मुंबई सोडून दिल्लीत स्थायिक झाले. दिल्लीच्या मेहरौलीच्या छतरपूर भागात ते राहत होते.

श्रद्धासोबत भांडण झाल्यानंतर आफताबने तिची हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि इकडे तिकडे फेकून दिले. दुसरीकडे, मुलीचा फोन थांबल्याने त्रस्त वडिलांनी दिल्ली गाठली आणि त्यानंतर प्रकरण उघडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com