Shraddha Walkar's Father Said:..तर आज श्रद्धा जिवंत असती..; श्रद्धाच्या वडीलांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Shraddha Walkar Murder Case: माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, याबाबत मला देवेंद्र फडणवीस, पोलिसांनी आश्वासन दिले आहे,"
Shraddha Walker case
Shraddha Walker caseSarkarnama

Shraddha Walkar Murder Case: श्रध्दा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर पहिल्यादांच तिचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

विकास वालकर म्हणाले, "श्रद्धा वालकर हीच्या हत्येचा तपास वसई आणि दिल्ली पोलिस करीत आहे. हा तपास योग्य दिशेने सुरु आहे. पण सुरवातीला याबाबत खूप त्रास झाला. वसई पोलिसांनी सहकार्य केलं नाही, अन्यथा माझी मुलगी जिवंत असती. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, याबाबत मला देवेंद्र फडणवीस, पोलिसांनी आश्वासन दिले आहे,"

Shraddha Walker case
Pune News : मुख्यमंत्री शिंदे पुण्याच्या 'या' प्रश्नात लक्ष घालणार..

"माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आफताब पूनावाला याला कठोर शिक्षा व्हावी, तसेच त्याच्या कुटुबियांची देखील चौकशी झाली पाहिजे. या कटात सहभागी झालेल्यांचीही चौकशी झाली पाहिजे. धर्म जागृतीवर भर दिला पाहिजे, माझ्या मुलीचे जे झाले ते दु:खदायक आहे," असे वालकर म्हणाले.

आफताब पूनावाला याला आज (शुक्रवारी) दिल्लीतील साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येणार आहे. 10 दिवसांपूर्वी आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर 4-5 जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे तिहार जेलने दिल्ली पोलिसांच्या तिसर्‍या बटालियनला आफताबला विशेष सुरक्षा देण्यास सांगितले आहे. सुनावणी दरम्यान, पोलीस आरोपीविरुद्ध पुरावे न्यायालयात सादर करण्याची शक्यता आहे.

Shraddha Walker case
Udayanraje Bhosale : मोदींच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले, "कोश्यारींच्या कारवाईवर मोदी गांर्भीयाने.."

गेल्या महिन्यात आफताबला दिल्लीच्या आंबेडकर हॉस्पिटलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आफताब हा बहुतांश वेळा बुद्धिबळ खेळतो, अशी माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी अलीकडेच दिली होती.

तो अनेकदा एकटाच खेळतो आणि पांढरे-काळे तुकडे एकटाच हलवतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यासोबत कैद असलेल्या दोन कैद्यांचे त्याच्याशी भांडण झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in