वानखेडेेंचे जात प्रमाणपत्र रद्द होणार? थेट नोटीस पाठवल्यानं वाढल्या अडचणी

अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग, मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत.
Sameer Wankhede Latest Marathi News
Sameer Wankhede Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग, मुंबईचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी नोटीस वानखेडे यांना पाठवली आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले होते. (Sameer Wankhede Latest Marathi News Update)

मुंबईच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी सुरू आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी वानखेडे यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. पण वानखेडे यांच्या वकिलांनी हे प्रमाणपत्र नसल्याचे समितीला सांगितले होते. बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव (Nitin Yadav) यांनी मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याबाबत अर्ज केला होता. कार्यालयातील उपलब्ध अभिलेख तपासला असता समीर वानखेडे या नावे जात पडताळणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे, असं उत्तर समितीकडून यादव यांना देण्यात आले होते. (Caste Committees Show Cause Notice to Sameer Wankhede)

Sameer Wankhede Latest Marathi News
UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाचे कुलगुरु ५ लाखांची लाच घेताना रंगेहात जाळ्यात

वानखेडे यांचा जातीचा मिळालेला किंवा घेतलेला खोटा दाखला चौकशी करुन रद्द करावा व त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी समितीकडे केली आहे. वानखेडे यांचे जन्मदाखला, जात प्रमाणपत्र, याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीची कागदपत्रे सातपुते यांनी समितीसमोर यापूर्वीच मांडली आहेत. याबाबत मागील काही महिने समितीसमोर सुनावणीही झाली आहे.

त्यानंतर समितीने 29 एप्रिल रोजी वानखेडे यांना जात प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. तक्रार, कागदपत्रे आदींच्या माध्यमातून वानखेडे हे मुस्लिम असल्याचे सध्द होते. त्यामुळे त्यांना 29 एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये पाच मार्च 2008 रोजी जारी करण्यात आलेले महार जातीचे प्रमाणपत्र रद्द का करू नये, असं म्हटलं आहे.

Sameer Wankhede Latest Marathi News
फास आवळला; संदीप देशपांडे यांचा चालक पोलिसांच्या जाळ्यात

मलिक यांनी काय केला होता आरोप?

वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे, असा दावा मलिकांनी केला होता. त्यावरून राज्यात मोठं वादळ उठलं होतं. मलिकांच्या दाव्यानंतर वानखेडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांकडून विविध कागदपत्रे सादर करण्यात आली. मलिकांनीही वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे फोटो, निकाहनामा समोर आणले. हे प्रकरण केंद्रीय अनुसुचित जाती जमाती आयोगाकडेही गेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com