मोरबी दुर्घटना अॅक्ट ऑफ फ्रॉड म्हणायची का? ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

Uddhav Thackeray| PM Narendra Modi| पाच दिवसांपूर्वी म्हणजे 25 ऑक्टोबरला पूल सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता.
 PM Narendra Modi|
PM Narendra Modi|

PM Narendra Modi -Shivsena मुंबई : रविवारी उत्साहाने गजबजलेला मोरबीचा हलता पूल एका क्षणात ‘मृत्यू’चा पूल बनला. ही दुर्घटना ‘ऍक्ट ऑफ फ्रॉड’ म्हणावी, घातपात म्हणावी की निव्वळ अपघात? असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रत्येकाची उत्तरे गुजरात सरकारला द्यावीच लागतील.'' असे म्हणत दैनिक सामनातून ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर निशाणा साधला आहे.

 PM Narendra Modi|
Bachchu Kadu : आज भूमिका जाहीर करणार : कार्यकर्त्यांच्या भावना मात्र संतप्त!

''पूल दुर्घटना, मग ती पश्चिम बंगालची असो किंवा रविवारी गुजरातमधील मोरबी येथील घडलेली, देशासाठी दुःखद आहे. फरक इतकाच की, त्यावेळी पश्चिम बंगाल सरकारकडे जे अंगुलीनिर्देश करीत होते त्यांचेच गृहराज्य असलेल्या गुजरात सरकारकडे आज त्याच कारणावरून बोटे दाखविली जात आहेत. त्यावेळी त्यांनी इतरांना जे प्रश्न विचारले त्याच प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आज त्यांच्यावर आली आहे. काळ हा असाच असतो. रविवारी उत्साहाने गजबजलेला मोरबीचा हलता पूल एका क्षणात ‘मृत्यू’चा पूल बनला. ही दुर्घटना ‘ऍक्ट ऑफ फ्रॉड’ म्हणावी, घातपात म्हणावी की निव्वळ अपघात? असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रत्येकाची उत्तरे गुजरात सरकारला द्यावीच लागतील. असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पाच दिवसांपूर्वी म्हणजे 25 ऑक्टोबरला पूल सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता. सहा महिन्यांपासून दुरुस्ती केला जात असलेला पूल सामान्यांसाठी खुला होतो आणि पाचच दिवसांत कोसळतो, 140 पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतो हे सगळेच धक्कादायक आणि संतापजनक आहे. मग दुरुस्ती नेमकी काय आणि कशाची झाली? कशी झाली? 140 पेक्षा जास्त मृत्यूंची ही जबाबदारी कोणाची? पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच गुजरात सरकार दुर्घटनेची सखोल चौकशी करणार आहे. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, पण हा सगळा प्रकार ‘बैल गेला नि झोपा केला’ असाच नाही का? गेलेले 140 जीव परत येणार आहेत का? असा सवालही ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com