मुंबईत सर्व दुकाने रात्री दहापर्यंत सुरू राहणार; विकेंड लॉकडाऊनही रद्द - Shops, Mall remain open till 10 pm in Mumbai-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

मुंबईत सर्व दुकाने रात्री दहापर्यंत सुरू राहणार; विकेंड लॉकडाऊनही रद्द

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

राज्यातील 11 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला.

मुंबई : राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत मंगळवारी राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये सर्व दुकानांना रात्री आठ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण मुंबईतील निर्बंधांबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले होते. त्यानुसार मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे. तसेच विकेंडचा लॉकडाऊनही रद्द करण्यात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. (Shops, Mall remain open till 10 pm in Mumbai)

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील 11 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्याचा आदेश सोमवारी जारी करण्यात आला. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व दुकानं व मॉल रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

हेही वाचा : पुणे, सातारा, सांगलीसह या अकरा जिल्ह्यांना दिलासा नाहीच! निर्बंध कायम राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या स्तरातील निर्बंध आहेत. पण मागील काही दिवसांपासून अनेक जिल्हयांमधील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील कमी करण्याची मागणी होत होती. त्याअनुषंगाने या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार याबाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला.

निर्बंध कायम राहणाऱ्या 11 जिल्ह्यांमध्ये पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील रुगसंख्या आणकी वाढल्यास लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले जातील. त्याचप्रमाणे मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यांबाबत स्थानिक प्रशासनाला निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

त्यानुसार मुंबई महापालिकेने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत चालू ठेवण्यात परवानगी असले. तर मेडिकल व संबंधित दुकाने आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सुरू राहतील. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहतील. जलतरण तलाव व निकट संपर्क येणारे क्रीडा प्रकार वगळून इतर खेळांना सर्व दिवस परवानगी देण्यात आली आहे. तसेच चित्रीकरण नियमित वेळनुसार सुरू ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. 

मुंबईसह 14 जिल्हे वगळून शिथील करण्यात आलेले निर्बंध : 

- सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्यास मान्यता.
- शनिवारीही अनलॉक, दुपारी ३ पर्यंत सर्व दुकानं खुली ठेवता येणार. 
- दुकानांसोबत मॉलही खुले होणार.
- रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू
- सर्व खासगी आणि शासकीय कार्यालयं ही संपूर्ण क्षमतेने खुली राहणार
- सर्व उद्याने, मैदाने खुली राहणार 
- हॉटेल्स सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने खुली राहतील. इतर वेळेत पार्सल सेवा सुरू राहील. 
- ब्युटी पार्लर, स्पा, हेअर सलून, जिम, योगा क्लासेस सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत, शनिवारी दुपारी ३ पर्यंत ५० टक्के क्षमतेने खुले ठेवण्यास परवानगी.  
- सिनेमागृह, मस्टिप्लेक्सना अद्याप परवानगी नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख