
Former Shiv Sena MLA Died परळ लालबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई (Suryakant Desai) यांचा डोंबविली येथे मृत्यू झाला आहे. एका रुग्णलायातून दुसऱ्या रुग्णलायात नेताना रुग्णवाहिका बंद पडली. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नसल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत देसाई यांचा मुलगा ऋषिकेश म्हणाले की, "त्यांची ऑक्सिजन लेवल ६० पर्यंत होती. त्यांना एका रुग्णलायातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी रुग्णवाहिका बंद पडली. बंद पडलेली रुग्णवाहिका काही अतंर ढकलली. दरम्यान संपर्क केल्यानुसार दुसरी रुग्णवाहिका आली. त्यातून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा इसीजी काढला. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली होती. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे."
माजी आमदार देसाई हे १९९५ ते २००० या काळात परळ- लालबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार होते. गेली २३ वर्ष देसाई ते डोंबिवली पश्चिमेकडील भागशाला मैदान येथील काशीकुंज सोसायटी येथे राहत होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.