
Mumbai: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वांद्रे येथील आता मातोश्री बंगल्यात जागा कमी असल्यानं त्यासमोर नवीन मातोश्री-2 बंगला बांधण्यात येत आहे. मात्र, नव्या ‘मातोश्री’च्या बांधकामादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिंत दुरुस्ती करताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवराम वर्मा याचा शुक्रवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी कंत्राटदार दत्ता पिसाळ (वय 30 ) यांच्यावर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम वर्मा हा कामगार बुधवारी (दि.१७ ) नव्या मातोश्री(Matoshree) च्या भिंती दुरूस्तीचं काम करत होता. हा कामगार १० ते १२ फूट उंचीवर शिडीच्या साह्यानं चढून भिंतीच्या दुरूस्तीचं काम करत होता. पण अचानक त्याचा तोल सुटला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी(दि.१९) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
...म्हणून नवीन 'मातोश्री'ची निर्मिती!
महाराष्ट्रात 1995 मध्ये शिवसेना-भाजपची सत्ता आल्यावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनी मातोश्री बंगल्यात सुधारणा करून तळमजला असलेली तीन मजली इमारत बांधण्यात आली. आता मातोश्री बंगल्यात जागा कमी असल्यानं त्यासमोर नवीन मातोश्री-2 बंगला बांधण्यात आला आहे.
उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची ही नवीन इमारत आठ मजली आहे. त्यात 3 डुप्लेक्स फ्लॅट्स आहेत. तर 5 बेडरूम, स्टडी रूम, होम थिएटर, स्विमिंग पूल, हाय-टेक जिम आणि मोठा हॉल देखील आहे. मातोश्री-2 ला दोन प्रवेशद्वार असतील. एक प्रवेशद्वार कलानगरमधून तर दुसरे प्रवेशद्वार बीकेसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असेल.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.