Eknath Shinde : ठाकरेंना धक्का! शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालं; एकनाथ शिंदे म्हणाले...

Shivsena : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली असून आता धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Eknath Shinde
Shivsena Symbol : एकनाथ शिंदे शिवसेना भवनावर दावा करणार? ठाकरे म्हणाले...

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच शिंदे पुढे म्हणाले की, ''निवडणूक आयोगाने लोकशाहीला धरून निर्णय दिला आहे. त्यांचे धन्यवाद. लोकशाहीमध्ये सत्याचा विजय झाला. हा संघर्षाचा विजय आहे'', असं शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Thackeray Vs Shinde : शिवसेनेकडे उरले चारच खासदार; प्रतिज्ञापत्र देण्याचे टाळलेले पाचवे खासदार कोण?

दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. तसेच यावर अद्याप उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. त्यामुळे ते नेमकं यावर काय भूमीका मांडणार? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com