सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने धक्का; मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केलं दु:ख

Cyrus Mistry Passes Away News : सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आदरांजली वाहिली आहे.
Cyrus Mistry Passes Away News
Cyrus Mistry Passes Away News Sarkarnama

मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात उद्योजक सायरस मिस्त्री यांचे निधन झालं आहे. सायरस यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आदरांजली वाहिली जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही दु:ख व्यक्त व्यक्त केलं आहे. (Cyrus Mistry Passes Away News)

Cyrus Mistry Passes Away News
सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला आहे. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,”अशा भावना मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केल्या आहेत.

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं. 'पालघरजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्याची बातमी कळताच धक्का बसला. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो,' असे ट्वीट फडणवीस यांनी केलं आहे. याबरोबरच या अपघाताबाबत पोलीस महासंचालकांसोबत चर्चा झाली असून या अपघात प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Cyrus Mistry Passes Away News
Cyrus Mistry : अपघातात सायरस मिस्त्रींचे निधन, फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान, सायरस मिस्त्री हे आपल्या कारने तीन मित्रांसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईकडे येत होते. यावेळी ते पालघरजवळील चारोटी या ठिकाणी चारोटी नाक्याजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार नदीच्या पुलाला जाऊन धडकली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायरस मिस्त्रींचा मृत्यू झाला. मिस्त्री यांच्यासोबत असलेल्या पंडोले नामक व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे, तर इतर दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अधिक तपास पालघर पोलिस करीत आहेत.

दरम्यान, अनेक दिग्गजांकडून सायरस यांच्या मृत्यू बद्दल दु:ख व्यक्त केलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com