Bazar Samiti Result : भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटलांना धक्का; बाजार समितीत महाआघाडीची बाजी

APMC Election| १४ संचालक निवडीसाठी महविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युतीमध्ये थेट झाली.
Bazar Samiti Result :
Bazar Samiti Result : Sarkarnama

Bhiwandi Bazar Samiti Result : भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी मारली असून याठिकाणी ११ पैकी सात जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे भिवंडी मतदार संघाचे खासदार आहेत. त्यांच्याच पक्षाला बाजार समितीच्या निवडणुकीत जनतेने नाकारले आहे. त्यामुळे पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. (Bazar Samiti Result)

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १४ संचालकांच्या निवडणुकीसाठी (२८ एप्रिल) सकाळी नऊ ते सायंकाळी चार या काळात मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी तालुक्यातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रात मतदान पार पडले. (Bazar Samiti Latest news)

Bazar Samiti Result :
Sangamner Bazar Samiti Results: संगमनेर बाजार समितीत आजी-माजी महसूलमंत्र्यात प्रतिष्ठेची लढाई; कोण मारणार बाजी?

१४ संचालक निवडीसाठी महविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युतीमध्ये थेट झाली. मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर व्यापारी व आडते गटातील दोन तर हमाल तोलारी गटातील एक आणि सेवा संस्था गटातील एक असे चार सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली . तर सेवा संस्था गटातील १०, ग्रामपंचायत गटातील ४ अशा १४ गटातील संचालक निवडीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत शिवसेना- भाजप श्रमजीवी संघटना विरुद्ध महविका आघाडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com