राज्यसभा निवडणूक होणारच! दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं टाकला पहिला डाव

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली
Shivsena, BJP
Shivsena, BJPsarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा (Rajya Sabha Election) अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, भाजपने (BJP) माघार घेण्यास नकार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. यामुळं शिवसेनेनं (Shivsena) दगाफटका टाळण्यासाठी आता खेळी खेळली आहे. (Rajya Sabha Election News Updates)

राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी 3 पर्यंत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाही. यामुळे शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेनेला मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळं शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना ८ ते १० जून या कालावधीत मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भाजपकडून सहाव्या जागेवर धनंजय महाडिक तर शिवसेनेकडून संजय पवार मैदानात उतरले आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी १० जूनला विधान भवनात मतदान होईल. त्यापूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ८ जूनला मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई येणाऱ्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते १० जूनपर्यंत तेथे असतील. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडा फोडी होऊ शकते, ही शक्यता गृहित धरुन शिवसेनेनं आतापासूनच रणनीती आखली आहे, असे सूत्रांनी सांगितलं.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली. मात्र, भाजपने ही विनंती अमान्य केली असून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीची ऑफर भाजपने स्वीकारली नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केलं.

भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत आघाडीकडून भाजपला आणखी एक जागा देण्यात येईल, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांसमोर ठेवला होता. पण त्याला नकार देण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Shivsena, BJP
अमित शहा अडचणीत? भाजपच्या बड्या नेत्यानंच केली राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल

सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ

राष्ट्रवादी - 53

काँग्रेस - 44

शिवसेना - 55

बहुजन विकास आघाडी - 3

समाजवादी पार्टी - 2

प्रहार जनशक्ती पार्टी - 2

माकप - 1

शेकाप - 1

स्वाभिमानी पक्ष - 1

क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1

अपक्ष - 9

सत्ताधारी आघाडीकडे एकूण संख्याबळ- १७२

Shivsena, BJP
काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर? अजित दोवाल तातडीनं अमित शहांच्या भेटीला

विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ

भाजप - १०६

जनसुराज्य शक्ती - १

राष्ट्रीय समाज पक्ष - १

अपक्ष - ४

विरोधी पक्षाकडे असलेले एकूण संख्याबळ - ११२

भूमिका उघड न केलेले पक्ष

एमआयएम - २

मनसे - १

एकूण तटस्थ- ३

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com