लिहून घ्या, शिवसेना मुंबई महापालिकेत पराभूत होणार; मुनगंटीवारांचा दावा

Uddhav Thackeray| Sudhir mungantiwar| २०१९ मध्ये तुम्ही जेव्हा आमची साथ सोडली तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठीही हजारो कोटींचा खर्च झाला होता का?
Uddhav Thackeray| Sudhir mungantiwar|
Uddhav Thackeray| Sudhir mungantiwar|

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज ज्याप्रकारे मुलाखत दिली ती जनतेला पसंत नाही. याचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल, शिवसेनेला पराभूत व्हावे लागेल, मी रेकॉर्डवर सांगतो. लिहून घ्या, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. माझा हा दावा खोटा ठरला तर मी क्षमा मागेन, असेही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची दैनिक सामनातील मुलाखतीचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतींवर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. ''उद्धव ठाकरे आपल्या मुलाखतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चुका सांगत नाहीत. पण सत्तांतर होताना हजारो कोटींचा खर्च झाल्याचे सांगतात. मग २०१९ मध्ये तुम्ही जेव्हा आमची साथ सोडली तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठीही हजारो कोटींचा खर्च झाला होता का, असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे. मला जबरदस्तीने आणि इच्छा नसताना मुख्यमंत्री केल्याचं असे उद्धव ठाकरे सांगतात. अशी कशी जबरदस्ती असू शकते. पण असं कोणी जबरदस्तीने मुख्यमंत्री कसं काय करू शकतं, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे.

Uddhav Thackeray| Sudhir mungantiwar|
बंडखोरांकडून गलिच्छ राजकारण.. आईचे दूध विकण्याचे पाप केलं... संजय पवार

उद्धव ठाकरे यांची कौटुंबिक मुलाखत आहे. पण जनतेच्या मनात सहानुभूती मिळवण्यासाठीचा एक असफल प्रयत्न म्हणून या मुलाखतीकडे पाहिले पाहिजे. ते इतरांसाठी गद्दार शब्द वापरतात. मग २०१९ मध्ये तुम्ही काय केलं. माझ्या वडीलांचा फोटो लावून मतं मागू नका म्हणतात. मग वरळी विधानसभेत पंतप्रधान मोदींचे फोटो लावून मतं का मागितली, ते तुमचे वडील नव्हते. सुडाचं राजकारण नको मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस कोणी दिली, नारायण राणे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंदवला. नितेश राणेंना जेलमध्ये कोणी टाकलं. खासदार नवनीत राणांना १४ दिवस जेल मध्ये कोणी ठेवलं, असे सवाल मुनगंटीवार यांंनी उपस्थित केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in