Ganesh Visarjan 2022 : 'म्याव म्याव' च्या घोषणाबाजीनं राजकारण तापलं ; ठाकरे-शिंदे गट आमने-सामने

Ganesh Visarjan 2022 : आमदार सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तापले.
Ganesh Visarjan 2022 news update
Ganesh Visarjan 2022 news updatesarkarnama

मुंबई : राज्यात जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक (ganesh visarjan2022) पार पडली. राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

पण प्रभादेवी (prabhadevi) परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याने विसर्जन मिरवणुकीस गालबोट लागण्याचा प्रयत्न झाला.

ठाकरे-शिंदे गटातील कार्यकर्ते आमने-सामने आल्याने येथे काही काळ तणाव होता. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभादेवी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

प्रभादेवी परिसरात सार्वजनिक मिरवणूक आली त्यावेळी शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर या देखील त्याठिकाणी उपस्थित होत्या. मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सर्वकाही शांततेत होते. तसेच मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला जात असल्याचे प्रिया सरवणकर यांनी माध्यमांना सांगितले.

Ganesh Visarjan 2022 news update
MNS : '..आपली जबाबदारी' पार पाडण्यासाठी अमित ठाकरे मनसैनिकांसह दादर चौपाटीवर..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घडल्या प्रकारावर प्रतिक्रिया देत म्हटले की, "परिस्थितीची माहिती घेतली असून पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली जात आहे,"असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले.

शिंदे गटाचे समर्थक आमदार सदा सरवणकर यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तापले. यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते स्टेजवर आमनेसामने आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com