मुंबईत राजकारण तापलं ; राणांना रोखण्यासाठी शिवसैनिक सज्ज

नवनीत राणांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. तर त्यांनी येऊनच दाखवावं, असं प्रतिआव्हान माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिलं आहे.
मुंबईत राजकारण तापलं ; राणांना रोखण्यासाठी शिवसैनिक सज्ज
ravi rana, navneet ranasarkarnama

मुंबई : हनुमान चालिसावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे.शिवसेनेनं कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्याचा ठाम निर्धार खासदार नवनीत राणा (navneet rana ) व आमदार रवी राणा यांनी केला आहे. आज सकाळी 9 वाजता ते मातोश्रीवर जाणार आहेत. त्यासाठी राणा दाम्पत्यांचे खार येथील निवासस्थान व मातोश्री परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. (mp Navneet Rana Vs shivsena in Mumabai)

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मुंबईतील खारच्या घराबाहेर शिवसैनिक काल रात्रभर खडा पहारा दिला. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसेनेनं आखली आहे. रात्रीपासूनच शिवसैनिक त्या परिसरात जमले आहेत. राणा दाम्पत्य व मातोश्री जवळ बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. खासदार नवनीत राणांनी शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. तर त्यांनी येऊनच दाखवावं, असं प्रतिआव्हान माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) दिलं आहे.

ravi rana, navneet rana
सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला साहित्यिक गपगुमान प्रोत्साहन देतात ; मावजो यांची खंत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल दुपारी `मातोश्री`वर आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना हात जोडून नमस्कार केला. रात्री आठच्या सुमारास मुख्यमंत्री हे पुन्हा वर्षाकडे जाण्यास निघाले. तेव्हा त्यांनी शिवसैनिकांना घरी जाण्यास सांगितले. तुम्ही दिवसभर येथे थांबला आहात. आता आपापल्या घरी जा,असे आवाहन त्यांनी केले. मात्र त्यांचे आवाहन शिवसैनिकांनी मानले नाही. साहेब, आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आम्ही राणांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी कायम ठेवली. वेळ पडली तर दुसऱ्या दिवशीही आम्ही `मातोश्री`बाहेर थांबू, अशा प्रतिक्रिया या वेळी शिवसैनिकांनी दिल्या.

''बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असते तर आम्हाला कधीही कुणीही हनुमान चालीसा वाचण्यापासून अडवलं नसतं. आम्हाला हनुमान चालीसा म्हणण्यापासून का अडवलं जातं आहे? मला अडवणारे खरे शिवसैनिक नाहीत. ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असावेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे खरे शिवसैनिक असते तर त्यांनी आम्हाला मुळीच अडवलं नसतं,असे नवनीत राणा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

ravi rana, navneet rana
न्यायाधीशांनी राणेंना करुन दिली तुकोबारायांच्या अभंगाची आठवण

मातोश्रीच्या बाहेर आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता, सगळ्या कायदेशीर बाबी पाळून शांततेच्या मार्गाने आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत. आम्ही या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. हनुमान चालीसा महाराष्ट्रात वाचण्यापासून आम्हाला का अडवलं जातं आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही हनुमान चालीसा वाचणार आहोत असं रवी राणा यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.