Shiv sena : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार ; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावले

Shiv sena : महापालिकेनं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याची माहिती समोर आलेली नाही.
Uddhav Thackeray dusshera melava
Uddhav Thackeray dusshera melavaSarkarnama

मुंबई : "दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार," असा निर्धार शिवसेनापक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

विश्व हिंदू परिषदेचे (Vishwa Hindu Parishad) नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.

शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला होता, परंतु शिवसेनेला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळं शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. याबाबत ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले, "तात्रिंक-मांत्रिक बाबी काहीही असो मेळावा आम्ही शिवतीर्थीवर घेणार ," "दसऱ्या मेळाव्याबाबत संभ्रम नाही,दसरा मेळावा होणारच," असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाला ठसवायचं आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच शिंदे गट निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटानं शिवसेनेच्या पक्षचिन्हावर दावा सांगितल्यानंतर आता दसरा मेळावा हायजॅक करण्याची तयारी सुरू आहे.

शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेत स्थानिक पातळीपासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष सुरू आहे. याआधी शिंदे गटानं प्रतिशिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिंदे गट दसरा मेळाव्यासाठीही प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray dusshera melava
मोठी बातमी : राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट ; तासभर खलबतं ?

शिंदे गटानं शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना पक्षावर दावा ठोकला होता, निवडणूक आयोगाकडे अर्ज करत शिंदे गटानं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं, यासाठी अर्ज केला होता, त्यानंतर शिवसेनेनंही निवडणूक आयोगाकडे प्रतियाचिका दाखल केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गटात दसरा मेळाव्यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कात होतो. यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडित होण्याची चिन्हे दिसत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून शिंदे गटही सक्रिय झाला आहे.

शिवसेनेनं दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे, मुंबई महापालिकेकडून वर्षभरात काही ठराविक कार्यक्रमांनाच परवानगी देण्यात येत असते, त्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचाही समावेश आहे, परंतु अद्यापही महापालिकेनं शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी दिल्याची माहिती समोर आलेली नाही.

महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही...

उद्धव ठाकरे म्हणाले "हिंगोलीतले मातब्बर लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मला एका गोष्टीचा अभिमान आणि आश्चर्य वाटते. साधारणत: सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. संघ परिवारातील लोक हिंदुत्त्वाच्या शिवसेनेच्या परिवारात प्रवेश करत आहेत. पण पहिल्यांदाच महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसत आहेत. कारण गद्दारीनंतर महाराष्ट्राची माती ही मर्दांना जन्म देते, गद्दारांना नाही, याची प्रचिती दाखवणारी मंडळी शिवसेनेत येत आहेत. आम्ही हिंदुत्त्व सोडलं अशी आवई भाजपने उठवली होती, त्याला छेद देणारी ही सगळी घटना आहे."

मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल..

"शिवसेनेचं हिंदुत्त्व हे खरं हिंदुत्त्व आहे, भ्रमित करणारं नाही. कारण मूळ हिंदुत्त्व हे मातोश्रीने दाखवून दिलं आहे. म्हणून या मातोश्रीचं महात्म्य आणि महत्त्व टिकवण्यासाठी मी इथे आलो आहे. माझ्या माध्यमातून मी सर्व बांधवांना सांगत आहेत, तिथे अस्वस्थ वाटत असेल तर मातोश्रीचं दार उघडं आहे. मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल," असे उद्धव कदम यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com