Uddhav Thackeray : काय सांगता : धनु्ष्यबाणानंतर ठाकरेंच्या हातातून आता 'मशाल'ही जाणार ?

Shivsena Mashal Controversy Samata Party : समता पार्टी निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहे.
Shivsena Mashal Controversy Samata Party
Shivsena Mashal Controversy Samata Party Sarkarnama

Shivsena Mashal Controversy Samata Party : शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर मूळ शिवसेनेवर हक्क सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दाव्यावर काल (शुक्रवारी) केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिक्कामोर्तब केले.

७८ पानी निकालपत्रात आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे. शिवसेना या पक्षनावासह धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बहाल केले.

या निकालानंतर ठाकरे गटाला धक्का बसला आहे, त्यानंतर आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पार्टीने पुन्हा एकदा दावा केला आहे.

ठाकरे गटाला मशाल चिन्ह देऊ नये, अशी मागणी समता पार्टी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत समता पार्टी निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहे, असे समता पार्टीचे महासचिव कैलास कुमार यांनी सांगितले.

Shivsena Mashal Controversy Samata Party
Kangana Ranaut : धनुष्यबाण शिंदेंकडे, कंगनानं सोडले ठाकरेंवर टीकेचे बाण ; म्हणाली, 'ते आता कधीच उठणार नाहीत..'

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले होते. त्यानंतर ठाकरेंना मशाल चिन्ह बहाल करण्यात आले. तेव्हाही समता पार्टीने ठाकरे गटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका तेव्हा न्यायालयानं फेटाळली होती.

याआधीच निवडणूक आयोगाने समता पक्षाला Unrecognised Party म्हणून जाहीर केलं आहे. मशाल चिन्ह आमच्या पार्टीचे असल्याचा दावा समता पार्टीने केला होता. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला चिन्ह देऊ नये, अशी याचिका समता पार्टीने दाखल केली होती. द्विसदस्यीय खंडपीठानेही याचिका फेटाळून होती.

Shivsena Mashal Controversy Samata Party
Tushar Kamthe : 'सरकारनामा'चे वृत्त खरे ठरले ; भाजप सोडलेले माजी नगरसेवक कामठे राष्ट्रवादीत

समता पार्टीचं चिन्हं unrecognised झाल्यानंतरच ठाकरे गटाला हे चिन्हं देण्यात आलेले आहे. मागील पाच वर्षाचा इतिहास पाहता, समता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. महाराष्ट्रात समता पार्टीचे फारसे अस्तित्व नाही. हे मुद्दे लक्षात घेऊन त्यांची याचिका फेटाळली होती. आता पुन्हा एकदा समता पार्टीने 'मशाल'वर दावा केला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शिंदे गटाकडून जोरदार जल्लोष सुरु असताना अभिनेत्री कंगना राणावत हीने उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे.कंगनाने टि्वट करीत निवडणूक आयोगाचे निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

"वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही," असे टि्वट कंगनाने केले आहे. यामुळे आता ठाकरे गट आणि कंगना वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com