Uddhav Thackeray : "आमची रणनीती तुम्ही उघड केली" ; ठाकरे गट निवडणूक आयोगावर संतप्त

Uddhav Thackeray : शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते?
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (shivsena) धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं आहे. दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून वेगवेगळी नावं आणि चिन्ह दिली आहेत. शिवसेना कुणाची हा निर्णय लागेपर्यंत दोन्ही गटांना आगामी निवडणुकांमध्ये याच चिन्हं आणि नावासह रिंगणात उतरावं लागणार आहे. (Andheri By Election latest news)

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये (Andheri By Election) उद्धव ठाकरे नवीन चिन्ह आणि पक्षाच्या नावासह रिंगणात उतरत आहेत. ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिलं असून शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्हाचं वाटप केलं आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नव्या पक्षनावांचे वाटप केलं आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. "आमची रणनीती तुम्ही उघड केली," असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला १२ मुद्द्यांचं पत्र लिहिलं आहे. यात ठाकरे गटाने आयोगावर ताशेरे ओढले आहेत. ठाकरे गटाचे वकिल विवेक सिंह यांनी हे पत्र निवडणूक आयोगाकडे सोपवलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे, शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. यात उमेदवारी कुणाला द्यायची यावरुन ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं असून दोन्ही गटांना नवीन नावं आणि चिन्हं दिली आहेत.

ठाकरे गटाचा आरोप काय ?

  1. नाव आणि पक्षचिन्ह वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकतं माप दिले.

  2. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयात पक्षपातीपणा केला

  3. आम्ही आयोगाकडे पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी दिलेले पर्याय जे जाणुनबुजून वेबसाईटवर टाकले.

  4. शिंदे गटाला आमची रणनीती समजली. अन्यथा दोन्ही दोन्ही बाजूंचे पर्याय सारखेच कसे होते?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com