उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांना कोणता कानमंत्र दिला?

Sachin Ahir| Uddhav Thackeray| लोकशाहीला धरून जर निर्णय झाला तर लोकशाही जीवंत असल्याचे समोर येईल
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई : ''सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. आजच्या सुनावणीनंतर सकारात्मक वातावरण आहे. आज न्यायालयाने जे सांगितले त्यामुळे वातावरण सकारात्मक वाटत आहे. घटनेच्या अधिकाराने जे दिले ते आम्ही मागत आहोत,'' असे विधान शिवसेना खासदार सचिन अहिर यांनी केले. राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेनेतील प्रवक्त्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीबाबत सचिन अहिर यांनी याबाबत माहिती दिली.

सचिन अहिर म्हणाले, सत्तानाट्य झाल्यानंतर ही प्रवक्त्यांची बैठक होती. पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केले. घटनेवर पक्ष चालतो आणि घटनेवर अवलंबूनच निर्णय होईल. आम्ही सकारात्मक आहोत. लोकशाहीला धरून जर निर्णय झाला तर लोकशाही जीवंत असल्याचे समोर येईल. तेजससारखा कार्यकर्ता आणि त्यांने केलेले काम पाहता संघटनात्मक नाही,पण चळवळ म्हणून कार्यरत आहे. पण त्याचे क्षेत्र राजकारण नाहीय. तो वेगळ्या क्षेत्रात आहे. संजय राऊत यांची उणीव भासेलच. त्यांची जागा कुणी भरू शकत नाही. पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्यामागे उभा आहे, अशी ग्वाही सचिन अहिर यांनी यावेळी दिली.

Uddhav Thackeray
पटोले आणि ठाकरेंचे ते दोन निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी डोकेदुखी ठरणार?

दरम्यान, न्यायालयात सुणावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री' (Matoshree) निवासस्थाना बाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शिवसेना संपण्याच्या मार्गावर असल्याच्या विधानाकडे लक्ष वेधलं. "शिवसेना संपतेय आता केवळ भाजपच राहणार," असं जेपी नड्डा म्हणाले होते.

“आजपर्यंत अनेकदा शिवसेनेला फोडण्याचे प्रयत्न झाले पण आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न आहे हे मी पहिल्यांदाच बोललो होतो आणि ते नड्डा यांनी बोलून दाखवले. खरंतर शिवसेनेत यापुर्वीही बंड झाले अशी बंड थंड करण्याची ताकदही माझ्याकडे आहे. पण आता राजकारणात तुम्हाला मुळापासून संपवण्याचा कट रचला जात आहे, असा गंभीर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com