BJP & Shivsena : ''एनडीएत भाजपकडून शिवसेनेला सापत्न वागणूक...''; शिंदे गटातील बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: ''आमची शिवसेना एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष....''
BJP & Shivsena
BJP & ShivsenaSarkarnama

Mumbai : राज्यात मागील वर्षी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार खासदारांनी मोठं बंड केलं होतं. तसेच यानंतर शिंदेंनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. सत्ता परिवर्तनानंतर भाजप शिवसेनेचं गुण्यागोविंदानं सत्तेत एकत्र नांदत असले तरी देखील मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे गटातील आमदारांमधील नाराजी लपून राहिलेली नाही. याचवेळी आता एनडीएत भाजपकडून घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहेत.

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर(Gajanan Kirtikar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. कीर्तीकर म्हणाले, आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. त्यामुळे आमची शिवसेना एनडीएचा एक प्रमुख घटक पक्ष आहे. म्हणून आमची पण कामं झाली पाहिजे. आम्हांला देखील एनडीएचा घटक पक्ष म्हणून दर्जा मिळाला पाहिजे. असं असताना भाजपकडून शिवसेनेला सापत्न वागणूक दिली जात आहे अशी खदखद कीर्तीकर यांनी बोलून दाखवली आहे.

तसेच २०१९ ला आम्ही २२ जागा लढवल्या होत्या. त्यातल्या १८ जागा जिंकलो आणिचार जागा हरलो. त्यामुळे आताही आम्हांला लोकसभेसाठी २२ जागा मिळायला हव्यात.

BJP & Shivsena
Cabinet Expansion : मंत्रिपदासाठी ५० आमदारांचे दिल्लीत लॉबिंग; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निष्ठावंतांसाठी जोरदार आग्रह

संजय राऊतांना टोला....

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राऊत म्हणाले, मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही. भाजपने पाळलेलं ते कोंबड्याचं खुराडं आहे. गावात खुराडं असतं, तसं हे खुराडं आहे. या खुराड्यातील कोंबड्यांच्या मानेवरून कधीही सुरी फिरवली जाईल आणि त्या कधीही कापल्या जातील. सकाळ, संध्याकाळ कोंबड्या आरवत असतात. तसे ते आहेत. कॉक कॉक कॉक करत आहेत. तसे करत आहेत.

डायरी ऑफ महाराष्ट्र खोका हा सिनेमा काढणार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. मिंधे टोळीने 22 काय 48 जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे 19 खासदार होते. महाराष्ट्रात 18 होते. आमचा 19 खासदारांचा आकडा कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावर भाष्य करताना खासदार गजानन कीर्तीकर म्हणाले, संजय राऊत म्हणजे घरबसल्या लोकांचं मनोरंजनाचं साधन झालं आहे. त्यांना एवढं गांभीर्यानं घेणं गरजेचं नाही.

BJP & Shivsena
Mumbai Loksabha Election: लोकसभेच्या जागांसाठी भाजप-शिंदे गटात वाटाघाटी; श्रीकांत शिंदे सोडणार हक्काचा मतदारसंघ?

ठाकरे - शिंदे एकत्र येण्याची शक्यता नाही....

तसेच ठाकरे शिंदे एकत्र येण्याविषयी आम्ही उध्दवजींशी बोललो होतो.त्यांना भाजपसोबत समझोता करण्याचाही सल्ला दिला होता. पण आता ती वेळ गेली आहे. त्यामुळे आता ठाकरे - शिंदे एकत्र येण्याची शक्यता नाही.

शिंदे लोकसभा निवडणुकीकरिता २२ जागांवर आग्रही...

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा आता महाविकास आघाडीनंतर आता भाजप(BJP) शिवसेनेच्या महायुतीपर्यंत येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता लोकसभेच्या २२ जागांवर दावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटानं २०१९ ला लढलेल्या २३ पैकी २२ जागांवर शिंदे गटाची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर लोकसभेसाठी शिंदे गटाचं मिशन २२ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीकरिता २२ जागांवर आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in