शिवसेना धनुष्यबाणही गमावणार?, उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य,'नव्या चिन्हाची तयारी ठेवा'

Shivsena|Uddhav Thackeray| एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली.
Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi
Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi

मुंबई : ''कायद्याने जी लढाई लढायची आहे ती लढूच मात्र कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा आणि कमी वेळात घराघरात पोहचवा,'' असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहे. शिवसेना-शिंदे गटातील संघर्षात आणखी एक वादाची ठिगणी पडली आहे. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला आहे. यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वादात आणखी एक ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Shivsena Latest Marathi News)

Shivsena News, Uddhav Thackeray News, Political News Updates in Marathi
एकनाथ शिंदे गटाचे आमदार चार दिवसातच गटबाजीने अस्वस्थ?

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने पक्षातील ४० आमदारांना पळवत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि या सर्व प्रक्रियेला न्यायालयाच्या पातळीवर त्यांना झालेली मदत पाहता शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हदेखील काढून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. कायद्याने जो काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.(Uddhav Thackeray News in Marathi)

गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हापासून शिवसेनेला धक्क्यावर धक्के मिळतच आहेत. विधीमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधीमंडळ गटनेते पदावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शिवसेनेने नेमलेले अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द करण्यात आले. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिल्याने भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देण्यात आली. तर शिवसेनेच्या सुनील प्रभूंचे प्रतोदपद रद्द करण्यात आले. विधिमंडळाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह गमवावं लागू शकतं, याची जाणीव झाल्यानंच उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिल्याचं मानलं जातंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in