Shivsena Symbol : आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार!

Shivsena Symbol : शिवसेना संपलेली नाही, शिवसैनिकांनो खचू नका..
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अखेर धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्यात आलेले आहे. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता. आज अखेर शिंदेंना धनुष्यबाण चिन्हं देण्यात आलेले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होती. या दरम्यानआयोगाने हा निर्णय आज दिला आहे.

Uddhav Thackeray
Shivsena Symbol : शिवसेनेची घटना लोकशाहीविरोधी : 'धनुष्यबाण' शिंदेना बहाल करताना आयोगाची 'ही' भूमिका!

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय यांना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याची आता स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. अनेकांचे याकडे लक्ष लागले होते.आज ७८ पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र दिले आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी मातोश्री निवास्थानावरून पत्रकार परिषद घेतली.

Uddhav Thackeray
Mungantiwar : घराणेशाहीच्या जोरावर राजकीय पक्ष ताब्यात ठेवता येणार नाहीत, याचा हा संकेत !

उद्धव ठाकरे म्हणाले, "लोकशाहीच्या दृष्टीने घातक, लोकशाहीला श्रद्धांजली वाहून देशात बेबंदशाही सुरू असल्याचे सांगा. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. न्यायालयात लढाई सुरू असताना आयोगाने निर्णय देवू नये, मात्र आता धनुष्यबाण चोरलेला आहे. हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. "

"न्यायाधीशांची जशी निवड होते, त्याचप्रमाणे निवडणूक आयेगाच्या अध्यक्ष निवड करण्याची आज गरज आहे. केवळ मुंबई जिंकण्यासाठी त्यांनी हा धनुष्यबाण त्यांना देवून टाकला. पण मशाल पेटलेली आहे. या अन्यायाला जनताच उत्तर देईल. काहींना वाटतं शिवसेना संपली. पण शिवसेना संपलेली नाही, शिवसेनेची शक्ती लोक दाखवून देतील. रावणाकडे ही धनुष्यबाण होता. मात्र सत्याचा विजय होत राहिलेला आहे. सत्याचा विजय होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Shivsena Symbol : शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, हा निकाल अनपेक्षित..

या निर्णयावर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, आम्ही सर्वेोच्च न्यायालयात याला आव्हान देवू. धनुष्यबाण तुम्ही घेऊ शकणार नाही. तु्म्ही धनुष्यबाण काही काळ चोरू शकता. धनुष्यबाण चोरल्याचा आनंद त्यांना घेऊ द्या. शिवसैनिकांनो कुठेही खचू नका, मी खचलेलेन नाही.. शिवसेनाचा विजय हेईल, आता विजयाशिवाय माघार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com