Shivsena Symbol : शिवसेनेची कार्यकारणी लोकशाहीला धरूनच ; ठाकरेंच्या खासदाराचा दावा!

Shivsena Symbol : अमृतकाळ आहे की विषकाळ, खासदारांचा सवाल..
Shivsena Symbol : UddhavThackeray
Shivsena Symbol : UddhavThackeraySarkarnama

Shivsena Symbol : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Politicis Crisis) केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर निकाल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंना हा आयोगाचा मोठा दणका मानला जात आहे. तसेच आयोगाने शिवसेनेची घटना लोकशाही विरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं होतं. यावर आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आक्षेप घेत या कार्यकारणीची निवड लोकशाही पद्धतीनेच झाल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेची कार्यकारणी ही लोकशाही पद्धतीनेच निवडण्यात आल्याचा दावा केला आहे. सावंत यांच्याकडून संबंधित कार्यकारणी निवडीचा व्हिडीओसुद्धा सादर करण्यात आलेले आहे. व्हिडीओ जाहीर करून ही कार्यकारणी निवड लोकशाहीपद्धतीने करण्यात आल्याबाबत पुराव्यांची पुष्टी जोडण्याचा प्रयत्न सावंत यांनी केला आहे.

Shivsena Symbol : UddhavThackeray
Prakash Ambedkar : आंबेडकरांनी ठाकरेंना दिला सल्ला ; 'या' मुद्दावर न्याय मिळेल..

अरविंद सावंत म्हणाले, "आजवर पंच्याहत्तर वर्षात जे झालं नाही, ते आज झालं आहे. हे अमृतकाळ आहे की विषकाळ असा, सवाल देखील सावंतांनी उपस्थित केला. आता हे ठरवावं लागेल. देशाच्या सर्वोच्च राज्यघटनेवर घाव घालताय.कशाला घटनेमध्ये १० वे परिशिष्टाची तरतूद केली. निवडणूक आयोग धादांत खोटं बोलत आहे," असे अरविंद सावंत म्हणाले.

Shivsena Symbol : UddhavThackeray
Shivsena Symbol : शिवसेनेची घटना लोकशाहीविरोधी : 'धनुष्यबाण' शिंदेना बहाल करताना आयोगाची 'ही' भूमिका!

निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेबाबत निरिक्षण काय?

आयोगाची भूमिका :

१) शिवससेनेची घटना घटना ही लोकशाहीविरोधी आहे.

२) नियुक्त्या करणयासाठी शिवसेनेने घटनेशी छेडछाड केली.

३) अशा पक्षाच्या ढाच्यात विश्वासार्हता नाही.

४) आयोगाला २०१८ च्या सुधारणा शिवाय, शिवसेनेची घटना मिळालेली नाही.

५) १९९९ मध्ये आयोगाच्या म्हणण्यावरून बाळासाहेब ठाकरे यांनी लोकशाहीच्या नियमाअंतर्गत घटना आणली.

६) मात्र १९९९ च्या आधीच्या लोकशाही विरोधी घटना ही परत छुप्या पद्धतीने पक्षात आणली गेली.

७) त्यामुळे पक्ष हा स्वतची मालमत्ता झाली. यामध्ये कोणतीही निवडणूक घेतली गेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com