राऊतांनी मानले फडणवीसांचे आभार ; म्हणाले, राज्याला लाभले नवे 'हरुन-अल-रशीद'

मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले.
devendra fadnavis, sanjay raut
devendra fadnavis, sanjay rautsarkarnama

पुणे : राज्याच्या सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या गुप्त भेटीबाबत अनेक चर्चा रंगल्या. याबाबत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी दोन दिवसापूर्वी गौप्यस्फोट केला होता. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी 'सामना'च्या 'रोखठोक'मधून फडणवीसांवर टीका केली आहे.

"फडणवीस रात्री उशीरा वेशांतर करुन बाहेर पडायचे, मलाही त्यांना ओळखणे कठीण जायचे.मी विचारले तर विषय टाळायचे, पण माझ्या लक्षात आले होते की काही तरी सुरु आहे, फडणवीस हुडी घालून बाहेर पडायचे," असे अमृता फडणवीस म्हणाल्या. आजच्या 'रोखठोक'मधून अमृता फडणवीसांचे राऊतांनी आभार मानले आहे.

devendra fadnavis, sanjay raut
पाणीपुरवठ्याबाबत पुणे महापालिकेचा महत्वाचा निर्णय ; उद्यापासून अमंलबजावणी

"पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सौ.अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. सौ. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच," असं वक्तव्य करत रोखठोकमधून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर

एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केलं, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही, असे सांगणारे आता भाजपवालेच उघडे पडले. ‘या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.’’ काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा, असे राऊतांनी म्हटलं आहे.

नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार?

नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी. असा आरोप करण्यात आला.हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in