आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मोठेपणा लागतो ; भाजपला टोला

राज्यातील विरोधी पक्षाकडे तेवढे विशाल मन उरले आहे काय?', असा सवाल करत शिवसेनेनं (Shiv Sena) भाजपला (bjp) चिमटा काढला आहे.
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavissarkarnama

पुणे : राज्यात सहा जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणुकीचा (zilla parishad election) निकाल नुकताच लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीतील यशाबाबत दावे करीत आहेत. 'सामना'च्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे. शिवसेनेने भाजप टीकास्त्र सोडलं आहे.

''महाराष्ट्रातील एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून भाजपने आपली ताकद दाखवली आहे. भाजपने 22 जागा जिंकल्या याचे दुःख वाटायचे कारण नाही, पण भाजपने या पोटनिवडणुकांत अनेक जागा गमावल्या आहेत त्याचे काय? असै प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीने बाजी मारली हे मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो. राज्यातील विरोधी पक्षाकडे तेवढे विशाल मन उरले आहे काय?', असा सवाल करत शिवसेनेनं (Shiv Sena) भाजपला (bjp) चिमटा काढला आहे.

''विधानसभा निवडणूक निकालातही भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्यांचे 105 आमदार निवडून आले, पण 105 आमदार असलेला भाजप आता एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहे. तेव्हा जिल्हा परिषद-पंचायत समिती पोटनिवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण म्हणा किंवा पंचनामा म्हणा, कुणाला काय करायचा तो करू देत, पण विरोधी पक्षाचे म्हणणे जनता मनावर घेणार नाही', असा इशारा शिवसेनेनं अग्रलेखातून भाजपला दिला आहे.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
वानखेडे हे परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्याच कॅटेगरीतील अधिकारी

'महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे 'मोठे' किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने 144 पैकी 73 जागांवर विजय मिळविला. भाजपास 33 जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने 73 पेक्षा 33 आकडा मोठा असे सिद्ध केले ते 'सरशी'वाल्यांनी सांगावे', असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

  • भाजपची धोरणे सरळ सरळ शेतकरीविरोधी आहेत. भाजप शेतकऱ्यांशी सूडाने वागत आहे. हा सूड शेतकऱ्यांचे मुडदे पाडण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचला हे काही माणुसकीचे लक्षण नाही.

  • काँग्रेसने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपला मात दिली. अकोल्यात ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीचा वरचष्मा राहिला.

  • माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ताब्यातील नरखेड पंचायत समितीवर भाजपने चढाई केली. प्रत्येक जय-विजयाची स्वतंत्र कारणे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com