Shivsena : 'शिवसेनेच्या पार्टी फंड पैशांवर दावा करणार?' शिंदे गटाचे केसरकर म्हणाले..

Deepak Kesarkar : "ठाकरेंचं आता सहानुभूती मिळवण्याचा खेळ खूप झाला.."
Deepak Kesarkar : Uddhav Thackeray
Deepak Kesarkar : Uddhav ThackeraySarkarnama

Shivsena : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे शिवसेना भवन व पक्षनिधीबाबत वेगवेगळ्या चर्चा घडून येताना दिसत आहेत. शिंदे गट आता शिवसेना भवन आणि शिवसेना पक्ष निधीवर दावा सांगणार का? याबाबतीत आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Deepak Kesarkar : Uddhav Thackeray
Supreme Court Hearing : बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? युक्तीवादात सिब्बलांनी दिले उत्तर...

केसरकर म्हणाले, "शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड शिंदे गट ताब्यात घेणयाचा प्रयत्न करत आहे, असा आमच्याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. परंतु तशी वस्तुस्थिती नाही. यापैकी आमच्या पक्षाला काहीही नको. उद्धव ठाकरे अशा गोष्टी करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. असलं काहीही आम्हाला नकोय, आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. "

Deepak Kesarkar : Uddhav Thackeray
Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड : सरन्यायाधीशांचा सवाल; ठाकरे गटाच्या वकिलांनी सुचविला ‘हा’ तोडगा

"ठाकरेंनी शिवसेनेची घटना बदलली आहे आणि हक्क स्वत:कडे ठेवले आहेत. शिवसैनिकांचे पैसे असे स्वतच:कडे वळवणे योग्य नाही. आदर असल्यामुळेच आम्ही शांत आहोत. ठाकरेंचा सहानुभूती मिळवण्याचा खेळ आता खूप झाला. आम्ही या सहा महिन्यात काय काय कामं केली ती दाखवतो. तुमच्या अडीच वर्षातली कामं तुम्ही दाखवा, असे केसरकरांनी थेट ठाकरेंनाच आव्हान दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in